Crime: काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, ७ जणांना बेड्या; विश्वास नांगरे पाटलांची कारवाई, ४६ गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड

Firing on Congress Leaders Home: नागपूरमध्ये २६ ऑगस्टच्या मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
Crime: काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, ७ जणांना बेड्या; विश्वास नांगरे पाटलांची कारवाई, ४६ गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड
Firing on Congress Leaders HomeSaam Tv
Published On
  • नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार

  • गोळीबारप्रकरणी ७ आरोपींना अटक

  • शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री करण्यात आला होता गोळीबार

  • ४६ गुन्हे दाखल असलेला नागपूर गोळीबाराचा मास्टरमाईंड

  • नागपूर गोळीबार प्रकरणातील चार आरोपी फरार

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली. ४ आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. महानगरपालिका प्रभाग क्रमांक २६ मधील काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर २६ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञातांनी गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने या गोळीबारात कुणी जखमी झाले नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली आहे. चार जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २६ ऑगस्टच्या मध्यरात्री भांडेवाडी परिसरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र नगरसेवकाच्या घरावर थेट गोळीबार करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या गोळीबारामध्ये आसपासचा परिसर हादरला होता.

Crime: काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, ७ जणांना बेड्या; विश्वास नांगरे पाटलांची कारवाई, ४६ गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड
Crime: कॉलेजला गेली पण परत घरी आलीच नाही, तरुणीसोबत जे घडलं ते ऐकून कुटुंबीय हादरले

या गोळीबार प्रकरणात आणखी चार आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. तपासादरम्यान या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधाराची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर ४६ वेगवेगळ्या पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. लवकरच त्याच्याशी एकूण ४ जणांना अटक होईल असा दावा पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी व्यक्त केला.

Crime: काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, ७ जणांना बेड्या; विश्वास नांगरे पाटलांची कारवाई, ४६ गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड
Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

या आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तयारीही पोलिसांनी सुरू केली आहे. ५० हजार रुपयांसाठी ही गोळीबाराची घटना झाली असल्याचा अंदाज आहे. शिवाय ड्रग प्रकरणात आरोपीचा संबंध असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, परिसरात दहशत निर्माण करणे आणि पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. मुख्य सूत्रधार अटक केल्यानंतर आणखी काही बाबींचा खुलासा होईल.

Crime: काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, ७ जणांना बेड्या; विश्वास नांगरे पाटलांची कारवाई, ४६ गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड
Mumbai Crime: नवरा-बायकोच्या भांडणानंतर घरात भयानक थरार, मुंबई हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com