नागपूर जिल्हा कोरोनाच्या विळख्यात; ३ महिन्यानंतर आढळली मोठी रुग्णसंख्या

फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या १० च्या वर नव्हती.
Nagpur Corona Update
Nagpur Corona UpdateSaam Tv
Published On

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपुरात (Nagpur) पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोकं वर काढलं आहे. जिल्ह्यात आठवडाभरात कोरोना रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे. अशातच गेल्या २४ तासांत नागपूर जिल्ह्यात २५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Nagur Corona latest News)

Nagpur Corona Update
वाळूचे टिप्पर सोडवण्यासाठी २१ हजारांची लाच; पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या १० च्या वर नव्हती. मात्र, जून महिना सुरू होताच पुन्हा एकदा नागपुरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल २५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरी भागातील १५, तर ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकीकडे नागपुरातील रुग्णसंख्या वाढत असली तरी, दिलासादायक बाब म्हणजे, १९ मार्चनंतर मृत्यूची नोंद नाही. रुग्णांची एकूण संख्या ५,७७,९०२ झाली असून, मृतांची संख्या १०,३३८ वर स्थिर आहे.

Nagpur Corona Update
HSC Result 2022 : आज बारावीचा निकाल; दुपारी १ वाजता असा करा चेक

कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या ५३ वर

विशेष बाब म्हणजे १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा फक्त १ रुग्ण ॲक्टिव्ह होता. हा रुग्ण बरा झाल्यानंतर आता नागपूर कोरोनामुक्त होणार अशी आशा आरोग्य विभागाला होती. मात्र, रुग्ण कमी न होताच त्यात वाढ होत गेली. सध्या जिल्ह्यात शहरातील ३४, ग्रामीण भागातील १८ तर जिल्हाबाहेरील १ असे एकूण ५३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे, सर्व रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

जिल्ह्यात दररोज ५०० हून अधिक चाचण्या

मार्च महिन्यात रोज हजारावर होत असलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या एप्रिल महिन्यात अर्ध्यावर आली. मे महिन्यात ४०० ते ५०० दरम्यान होत असताना मंगळवारी हा आकडा ५८७ वर गेला. चाचण्यांच्या तुलनेत ४.२५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्य शासनाने सोमवारीच आरोग्य विभागांना चाचण्या वाढविण्याचा सूचना दिल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com