Shivaji Patil
Shivaji Patil Saam Tv

वाळूचे टिप्पर सोडवण्यासाठी २१ हजारांची लाच; पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला

शिवाजी पाटील असं या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे
Published on

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत पथकाने (LCB) लाच घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी लातूरमध्ये विस्तार अधिकाऱ्याला 5 हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते. आता नांदेडमध्येही (Nanded) लाचलुचपत पथकाने एका पोलीस कर्मचाऱ्याला 21 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. (Nanded Latest Crime News)

Shivaji Patil
पतीच्या निधनानंतर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; ९ महिन्यांची चिमुकली थोडक्यात बचावली

शिवाजी पाटील असं या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचं असून शिवाजी हे नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्यांच्यासोबत मारुती कांबळे नामक आणखी एक व्यक्ती होता. वाळूचे तीन टिप्पर चालवण्यासाठी 21 हजारांच्या लाचेची मागणी या पोलीस कर्मचाऱ्याने केली होती.

दरम्यान, लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत पथकाला दिली. ओंकारेश्वर नगर जवळ शिवाजी पाटील आणि मारोती कवळे यांनी 14 हजार रुपये रोख रक्कम आणि फोन पे वरून 7 हजाराची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले.

Shivaji Patil
'ज्यादा द्याल ताण, तर उलटा घुसेल बाण'; औरंगाबादेत शिवसेना vs भाजप पोस्टर वॉर

यावेळी तपासणीत शिवाजी पाटील याच्या खिशात अडीच लाख रुपये देखील सापडले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील आणि खासगी व्यक्ती मारूती कवळे विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी पाटील याने वरिष्ठांच्या सांगण्यावरून तर लाच स्विकारली नाही ना? याचा तपास लाचलूचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com