Accident: काँग्रेसच्या स्थानिक नेत्याचा भीषण अपघात, कार तीन-चार वेळा उलटून थेट पुलाखाली कोसळली

Congress Corporator Accident : नागपूर महानगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या कारचा अपघात झाला आहे. मध्यप्रदेशातून परत येताना त्यांच्या कारचा अपघात झालाय.
Accident :
Congress corporator Shubham Motghare escaped unhurt after a major road accident in Madhya PradeshSaam Tv
Published On
Summary
  • नागपूरचे काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या कारचा मध्य प्रदेशात भीषण अपघात झाला.

  • कारसमोर नीलगाय आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.

  • कार तीन-चार वेळा उलटून थेट पुलाखाली कोसळली.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

मध्य प्रदेशात नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या कारचा अपघात झाला आहे. शुभम मोटघरे आपल्या सहकाऱ्यांसोबत मध्यप्रदेशातून परत येत होते. त्यावेळी त्याच्या कारचा अपघात झालाय. कारसमोर नीलगाय आल्याने ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार तीन ते चारवेळा उलटली आणि थेट पुलाखाली कोसळली. दरम्यान अपघातात मोटघरे थोडक्यात बचावले, सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाहीये. शुभम मोटघरे हे प्रभाग 26 चे नागपूर महानगर पालिकेचे नगरसेवक आहेत.

सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकची दुचाकीला भीषण धडक, तिघांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी एक अत्यंत वेदनादायक आणि भीषण रस्ते अपघात घडला. एका वेगवान आणि अनियंत्रित सिमेंट भरलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Accident :
Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

नेमकी घटना कुठे घडली?

अपघाताची घटना बालाघाट येथील भरवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेगाव शहराजवळ घडली. दुचाकीवरील तिन्ही तरुण भरवेली येथील खाणीमध्ये कामाला जात होते. ते भरवेलीच्या दिशेने येत होते, तर सिमेंटने भरलेला ट्रक बैहरच्या दिशेने जात होता. या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर दुचाकी चालक तरुण ट्रकसोबत सुमारे ५० मीटरपर्यंत फरफटत गेला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Accident :
Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. रात्री अपघात झाला तेव्हा त्यांची ओळख पटली नव्हती, नंतर नातेवाईकांनी रुग्णालयात पोहोचून त्यांची ओळख पटवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com