Maharashtra Politics: मविआला सपाचा रामराम, ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेला विरोध

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या मविआला आता अधिवेशनात मोठा धक्का बसला आहे.
Abu Azmi and Rais Shaikh
Abu Azmi and Rais Shaikhgoogle
Published On

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या मविआला आता अधिवेशनात मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्याला विरोध करत समाजवादी पक्षानं मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ ५० च्या खाली आलंय.

विधानसभा निवडणुकीतल्या मोठ्या अपयशानंतर महाविकास आघाडी सावरत असतानात त्यांना विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसलाय. समाजवादी पार्टीने वेगळी वाट धरल्यानं महाविकास आघाडीत फूट पडलीय. मविआने ईव्हीएमचा निषेध करत आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे. पण अबू आझमी आणि रईस शेख या सपाच्या दोन्ही आमदारांनी शपथ घेतली. यानंतर त्यांनी मविआतून बाहेर पडल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानं आझमींनी नाराजी व्यक्त केली. तर ३१ वर्षांत आझमींना शिवसेनेची भूमिका माहित नाही का असा सवाल ठाकरे गटानं केलाय.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं संयमाची भूमिका घेत वरीष्ठ यातून मार्ग काढतील, असं म्हटलं आहे. सपा मविआतून बाहेर पडल्यामुळे मविआचं संख्याबळ पन्नासच्या खाली आलंय.

सपा बाहेर, मविआला धक्का

शिवसेना (ठाकरे गट) - 20

काँग्रेस - 16

राष्ट्रवादी काँग्रेस (SP)-10

शेतकरी कामगार पक्ष - 1

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - 1

मविआतील एकूण आमदार - 48

Abu Azmi and Rais Shaikh
Ballot Paper: मारकडवाडीत बॅलेटसाठी बॅटल, शरद पवार- राहुल गांधी मारकडवाडीत धडकणार

निवडणुकीत आमच्याशी संपर्क साधला नाही. तिकिट वाटपात बोलणी केली नाही. मग आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं काय? असा थेट सवाल आझमींनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काम करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले जाते. 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडणाऱ्यांचे अभिनंदन केले जाते. यावरही सपानं बोट ठेवलंय. मविआच्या दारुण पराभवानंतर आता मित्रपक्षही सोडून जात आहेत. बलाढ्य सत्ताधाऱ्यांसमोर विरोधकांची एकी खूप महत्वाची आहे. यापार्श्वभूमिवर आगामी महानगरपालिका निवडणुकीत मविआचा आणखी कस लागणार आहे.

Abu Azmi and Rais Shaikh
Ladki Bahin Yojana : 'या' महिलांचा अर्ज बाद होणार! कोणत्या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही हा लाभ लगेच चेक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com