MVA News: आघाडीत बिघाडी कोणाला हवी? उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी? राऊत - शहा भेट, मविआत फूट?

Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा वाद चांगलाच विकोपाला गेलाय. ठाकरेंच्या आक्रमकतेमुळे काँग्रेसही स्वबळाची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संजय राऊतांनी अमित शाहांसोबत भेट घेतल असल्याचा दावा काँग्रेसच्या सूत्रांनी केलाय.
आघाडीत बिघाडी कोणाला हवी? उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी? राऊत - शहा भेट, मविआत फूट?
Sanjay Raut, Uddhav Thackeray, Amit ShahSaam Tv
Published On

राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांचे अर्ज भरण्याची धामधूम सुरू झालीय. मात्र मविआतला जागावाटपावरून सुरू झालेला वाद मिटायला तयारी नाही. त्यातच,आता संजय राऊतांनी अमित शहांची भेट झाल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे, पुढील काही दिवसांत राजकीय भूकंप होणार की काय, अशी चर्चा रंगली असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेमुळे काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. तसेच, महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा कायम असून शिवसेना ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत असून 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र दोन्ही पक्षांनी ही चर्चा फेटाळून लावलीय.

आघाडीत बिघाडी कोणाला हवी? उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी? राऊत - शहा भेट, मविआत फूट?
Maharashtra Politics: मुरबाड मतदारसंघात मविआच्या अडचणीत वाढ, शरद पवार गटाचे नेते बंडाचा झेंडा फडकवणार?

याचबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत की, भाजपकडून गैरसमज पसरवण्याचं काम करत आहे. तर संजय राऊत म्हणाले की, 'भाजपशी हातमिळवणी म्हणजे अफजलखानाशी हातमिळवणी.' असं असलं तरी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद मिटत नसल्याचंच दिसतं. कोणत्या मुद्द्यावरुन वाद आहेत, हे जाणून घेऊ...

ठाकरे-काँग्रेसमधील वाद मिटेना?

  • पटोलेंकडून बैठकांमध्ये सौम्य भाषेचा वापर नाही.

  • नाना पटोलेंकडून नेत्यांचा एकेरी उल्लेख.

  • काँग्रेसवरील आक्षेपाबाबत आदित्य ठाकरेंची पवारांकडे तक्रार.

  • विदर्भातील 12 जागांवर काँग्रेसची ठाम भूमिका.

  • 12 जागांवर माघार न घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा खरगेंकडे आग्रह.

  • ठाकरे गटाची भूमिका सांगलीसारखीच असल्याचा काँग्रेसचा आक्षेप.

आघाडीत बिघाडी कोणाला हवी? उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची तयारी? राऊत - शहा भेट, मविआत फूट?
Murbad Politics : ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; खंद्या समर्थकाने तुतारी फुंकली, मुरबाडमध्ये किसन कथोरेंना आव्हान देणार?

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिल्लीत भाजपच्या जे पी नड्डांची भेट घेतल्याचा दावा वंचितनं केला होता. त्यामुळे, काँग्रेसच्या सुत्रांकडून देण्यात येत असलेल्या माहितीवरुन पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यामुळे जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावाच्या राजकारणातून ही चर्चा रंगलीय की खरंच राज्यात नवी आघाडी आणि युती दिसणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झालीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com