Manoj Jarange: २४ तासांत दुसऱ्यांदा पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला. दुसऱ्यांदा मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली.
Manoj Jarange: २४ तासांत दुसऱ्यांदा पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On
  • मनोज जरांगे यांना मोठा धक्का

  • मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा आंदोलनाची परवानगी नाकारली

  • मनोज जरांगे एकटे मुंबईला येणार

  • आझाद मैदान आंदोलनासाठी मनोज जरांगे यांना परवानगी नाही

  • पोलिसांनी परवानगी नाकारली तरी जरांगे मुंबईत येण्यावर ठाम

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आणि उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला. मुंबई पोलिसांनी २४ तासांत दुसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान येथील आंदोलनासाठी परवानगी नाकारली. मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी मुंबईतील आझाद मैदनावर बसणार होते. यासाठी ते आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. पण पोलिसांनी परवानगी नाकरल्यामुळे त्यांनी एकटच मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबई पोलिसांकडे पुन्हा परवानगीसाठी अर्ज केला होता. पण पोलिसांनी पुन्हा आंदोलनासाठीची परवानगी नाकारली. त्यामुळे मनोज जरांगे यांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान येथील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली. रविवारी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांच्याकडून दुसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. पण आज पुन्हा एकदा आझाद मैदान पोलिसांनी मुंबई आंदोलनाची परवानगी नाकारली. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कसे येणार हे पाहणं महत्वाचे राहिल. पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी देखील मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येऊन उपोषण करण्यावर ठाम आहेत.

Manoj Jarange: २४ तासांत दुसऱ्यांदा पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम
Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे ते एकटेच उद्या सकाळी ११ वाजता मुंबईला येणार आहेत. 'मुंबईला जायचं ठरलं आहे त्यात काहीच बदल होणार नाही. वेळ प्रसंगी जीव द्यायची वेळ आली तरी चालेल पण मुंबईला जाण्याचा दिलेला शब्द मागे घेणार नाही. मराठ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागून देणार नाही. मी अजिबात माघार घेणार नाही.', असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange: २४ तासांत दुसऱ्यांदा पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम
Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, 'देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या आडून मराठ्यांवर डाव टाकला. आपल्या रॅलीत घुसून दंगल घडवण्याचा त्यांचा डाव होता. देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकावा लागतो.परवानगी नाकारली ना मग फडणवीस मला एकट्याला परवानगी देणार की नाही? आझाद मैदानांवर आता मला परवानगी देणार का? मी एकटा आधी खिंड लढवतो आधी एकटा मी मुंबईत जातो. मुंबईत मराठा समाजाला योग्य वेळी बोलावलं जाईल. तुम्ही तुमच्या गावात सावध आणि सुरक्षित राहा. मराठा समाजाने आता नाराज होऊ नये. वेळप्रसंगी निर्णय बदलावे लागतात. निर्णय फक्त तुम्ही येण्याचा बदलला आहे. फडणवीस यांना डाव टाकून मराठ्यांना जिंकवावं लागेल सण उत्सव आहेत. मला कोण अडवतो कोण परवानगी नाकारतो ते बघतो.'

Manoj Jarange: २४ तासांत दुसऱ्यांदा पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम
Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com