Parshuram Ghat Landslide: राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे डोंगरमाथ्यावर माती भुसभुशीत होऊन अनेक भागांत दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. चिपळूणच्या परशुराम घाटात देखील काही दिवसांपूर्वी दरड कोसळण्याची घटना घडली होती. या घाटात दरड कोसळण्याचे हे सत्र अद्यापही सुरूच आहे. आज देखील पुन्हा एकदा परशुराम घाटात दरड कोसळली आहे. (Latest Parshuram Ghat News)
परशुराम घाटात अनेक पर्यटक येत असतात. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकीसाठी या घाटातून मार्ग आहे. अशात पावसाळा सुरू झाल्यापासून ३ वेळा या घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळल्याने येथील वाहतूक बंद करावी लागते. अनेकदा या घटनेत नागरिकांना दूखापत होते तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागतो. मात्र सुदैवाने आता कोसळलेल्या दरडीमुळे कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.
तसेच मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे. आता कोसळलेल्या दरडीपासून वाहतुकीस कोणताही धोका नाहीये. परशुराम घाटातील काँक्रीट रोडवरून वाहतूक सुरळीत सुरू आहे.
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai- Goa Highway) परशुराम घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी या घाटातील वाहतूक 25 एप्रिल 2023 पासून दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. पण 11 मे पासून हा घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
परशुराम घाट (Parshuram Ghat) हा एकूण पाउणे तीन किलोमीटरचा असून यापैकी फक्त 500 मिटरचे चौपदरीकरणाचे काम शिल्लक राहिलेले होते. शिवाय दीड किलोमीटरच्या सुरक्षा वॉलला भरावही करायचा असल्याने हा घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. जर हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले नसते तर या घाटातून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.