Balasore Train Accident Case: बालासोर ट्रेन अपघात प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक; नेमकं कारण काय?

Odisha Train Tragedy: शुक्रवारी सीबीआयने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employee) अटक केली.
odisha train accident
odisha train accidentSaam Tv

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणात (Balasore Train Accident Case) केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी सीबीआयने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employee) अटक केली. या प्रकरणात ही पहिली अटकची कारवाई आहे. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, वरिष्ठ विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार अशी अटक करण्यात आलेल्या तिन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं आहेत.

odisha train accident
Accident CCTV Footage : बाईकस्वाराचा अंगावर भलमोठं झाड कोसळून जागीच मृत्यू; थरारक घटनेचा VIDEO समोर

अरुणकुमार मोहंता, मोहम्मद अमीर खान आणि पप्पू कुमार यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 304 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिन्ही कर्मचारी बालासोर जिल्ह्यात तैनात आहेत. आरोपी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पुराव्याशी छेडछाड करत असल्याचे सीबीआयला तपासात आढळून आले. अटक आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

odisha train accident
Maharashtra Weather Alert: मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकणाला रेड अ‍ॅलर्ट, राज्यात कसा असेल पाऊस?

2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता बाहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसने स्टेशनजवळ उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसही त्याच्या कचाट्यात आली. या भीषण रेल्वे अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 1000 हून अधिक जण जखमी झाले होते. या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेने चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाचा तपास 6 जूनला सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या समितीला अपघाताचे मुख्य कारण 'चुकीचे सिग्नलिंग' असल्याचे आढळून आले आहे.

odisha train accident
Satara Crime News: साताऱ्यात आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार, ५ जणांवर गुन्हा दाखल

कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीने (CRS) रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, अपघाताच्या ठिकाणी असलेल्या बहानगा बाजार येथील स्टेशन मॅनेजरने S&T कर्मचार्‍यांना दोन समांतर ट्रॅक जोडणार्‍या स्विचच्या कामात अडथळे येत असल्याचे सांगितले असते तर दुरुस्ती करण्यात आली असती. नुकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बालासोर जिल्ह्यातील बहानगा मार्केट आणि त्याच्या आसपासच्या गावांच्या विकासासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com