Breaking News: मोठी बातमी! मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्यास तेलंगणामधून अटक

Mukesh Ambani Death Threat: श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे फोन येत होते.
Breaking News: मोठी बातमी! मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्यास तेलंगणामधून अटक
Breaking News: मोठी बातमी! मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्यास तेलंगणामधून अटक Saam Tv
Published On

Mumbai Breaking News:

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे मेल येत होते. या प्रकरणी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मुकेश अंबानी यांना धमकीचे मेल करणाऱ्यास अखेर अटक करण्यात आली आहे. गणेश वानपारधी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींना (Mukesh Ambani) गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे मेल येत होते. गेल्या सात दिवसांत मुकेश अंबानी यांना ४ वेळा धमक्यांचे मेल (Threat Mail) आले होते. शनिवारी २७ ऑक्टोंबर रोजी त्यांना धमकीचा पहिला मेल आला होता. ज्यामध्ये धमकी देणाऱ्याने २० कोटींची मागणी केली होती.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मेल करत त्याने तब्बल २०० कोटींची मागणी केली होती. पोलीस मला अटक करु शकत नाहीत, असेही या मेलमध्ये लिहले होते. आज (शनिवार, ४ नोव्हेंबर) पुन्हा एकदा तब्बल पाच मेल आल्याने खळबळ उडाली होती.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Breaking News: मोठी बातमी! मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्यास तेलंगणामधून अटक
Sanjay Shirsat: ३१ डिसेंबरनंतर ठाकरे गटाचे १५ आमदार फुटणार; संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट

अखेर मेल करणाऱ्या आरोपीला पकडण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आले आहे. मुंबई पोलिसांनी तेलंगणामधून (Telangana) गणेश वानपारधी या धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. पोलीस सध्या अधिक तपास करत असून कोणत्या कारणाने हे धमक्यांचे मेल केले, याबाबत आरोपीची चौकशी सुरू आहे. (Latest Marathi News)

Breaking News: मोठी बातमी! मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्यास तेलंगणामधून अटक
Kunbi certificate: मराठवाड्यापाठोपाठ राज्यभरात कुणबींच्या नोंदी शोधा; मुख्यमंत्री शिंदेंचे अधिकाऱ्यांना आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com