Mukesh Ambani Threat: उद्योगपती मुकेश अंबानी यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी; आरोपीकडून ४०० कोटींची मागणी

Mukesh Ambani Death Threat: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने अंबानी यांना धमकीचा मेल पाठवला आहे.
Another Death Threat to Mukesh Ambani
Another Death Threat to Mukesh AmbaniSaam TV
Published On

Another Death Threat to Mukesh Ambani

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने अंबानी यांना धमकीचा मेल पाठवला आहे. यावेळी त्यांच्याकडे ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मागील ई-मेलला प्रतिसाद न दिल्याने रक्कम २०० कोटींवरून ४०० कोटी रुपये इतकी करण्यात आल्याचं आरोपीने म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Another Death Threat to Mukesh Ambani
Jalna News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी; दोन मुलं झाली पोरकी

इतकंच नाही, तर आरोपीने पोलिसांच्या (Police) कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पोलीस माजा शोध घेऊ शकत नाही, ते मला अटक करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जीवे मारण्यापासून आम्हाला कुणीच रोखू शकत नाही. मग तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही. आमचा एक शूटर आहे जो तुम्हाला मारू शकतो, असं आरोपीने धमकीच्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.

विशेष बाब म्हणजे, आरोपीने मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही आठवडाभरातील तिसरी वेळ आहे. यापूर्वी अंबानी यांना पहिला धमकीचा मेल हा २७ ऑक्टोबर रोजी आला होता. तेव्हा आरोपीने २० कोटी रुपयांची मागणी केली होती. यानंतर अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध सुरू असतानाच २८ ऑक्टोबर रोजी आरोपीने अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. मागील ईमेलला प्रतिसाद न दिल्यामुळे ही रक्कम २० कोटींवरून २०० कोटी रुपये करण्यात आल्याचं आरोपीने ई-मेलमध्ये म्हटलं.

दरम्यान, आता अंबानी यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल आला आहे. यावेळी आरोपीकडून तब्बल ४०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. या धमकीच्या ईमेलनंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

Another Death Threat to Mukesh Ambani
Congress MLA Resigns: काँग्रेसला मोठा धक्का, मराठा आरक्षणासाठी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com