Kalyan Durgadi Fort: पठ्ठ्याचा शिवकालीन दुर्गाडी किल्ल्यावर दावा; अर्ज केला अन् फसला, काय आहे प्रकरण?

Kalyan News: पठ्ठ्याचा शिवकालीन दुर्गाडी किल्ल्यावर दावा; अर्ज केला अन् फसला, काय आहे प्रकरण?
Kalyan Durgadi Fort
Kalyan Durgadi FortSaam Tv
Published On

>> अभिजित देशमुख

Kalyan Durgadi Fort:

कल्याणमध्ये एक अजब पारकर समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने चक्क शिवकालीन किल्ले दुर्गाडीवर आपलं नाव लावत, हा किल्ला आपला असल्याचा दावा केला आहे. या व्यक्तीने बनावट कागदपत्र सादर करत हा दावा केल्याने त्याच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुयश शिर्के सातवाहन, असे या इसमाचे नाव आहे. शिर्के सातवाहन हा माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटनस्थल विकास समितीचे अध्यक्ष असल्याचे त्यांनी सादर केलेल्या अर्जात म्हटले होते. त्याने किल्ले दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Durgadi Fort
Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण; 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे: विजय वडेट्टीवार

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील किल्ले दुर्गाडी हा स्थान शिवकालीन आहे. किल्ले दुर्गाडी हा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे. माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकास समितीचे अध्यक्ष शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार त्याने एका जमीनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखल मागितला होता.  (Latest Marathi News)

हा अर्ज जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाकडे चौकशीकरीता गेला. त्याठिकाणाहून चौकशी होऊन तो कल्याण तहसील कार्यालयास प्राप्त झाला. कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रिती गुडे यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे की, ज्या जागेसंदर्भात शिर्के सातवाहन याने नाव लावण्याकरीता अर्ज केला होता. त्याठिकाणी किल्ले दुर्गाडी आहे. किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकीत आणि नोंदणीकृत नसल्याचे दिसून आले. तसेच अधिकची तपासणी आणि छाननी केली असता शिर्केची कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे दिसून आले, असे मंडळ अधिकारी गुडे यांनी म्हटले आहे.

Kalyan Durgadi Fort
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर CM शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, तात्काळ बैठक बोलावली

तसा अहवालच गुडे यांनी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांना सादर केल्यावर देशमुख यांच्या आदेशानुसार गुडे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिर्के याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात तहसीलदार देशमुख यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीने दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याचे पुरावे त्याने सादर केलेले नव्हते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com