Ladki Bahin Yojna : कुणाला आधार, कुणाच्या संसाराला हातभार; लाडक्या बहिणींची 'मन की बात' एकदा ऐकाच!

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांच्या नेमक्या भावना काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी संयम टीव्हीच्या टीमने या महिलांशी संवाद साधला आहे.
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin YojnaSaamTv
Published On

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचे धुमशान आता शांत झालं आहे. आज महायुती आपलं सरकार स्थापन करणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला आणि विशेषत: भाजपला मिळालेला हा विजय 'न भूतो न् भविष्यति' असाच ठरला आहे. गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भाजप आणि महायुतीकडून अनेक कामं करण्यात आली, वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. ज्यातल्या काही चालल्या, तर काही फसल्या आणि काही योजनांची माहितीच लोकांपर्यंत पोहोचली नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आहे.

2024 च्या जुलै महिन्यात महिलासबलिकरणाचा मुद्दा पुढे ठेऊन महायुतीकडून राज्यातील महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यासाठी तरतूद करण्यात आली. राज्यातल्या सगळ्या महिला या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणी आहेत. त्यांच्या दातृत्वाची जबाबदारी आमची आहे, अशा प्रकारची भावनिक साद महायुती सरकारने महिलांना घातली.

Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार?

कुठल्याही महिलेला आपल्या माहेरकडची नाती फार प्रिय असतात. त्यातही सासुरवाशीण, कोणतीही कमाई नसलेली आणि जी फक्त दिवसभर सासरच्या मंडळींसाठी घरात राबत असते, अशा महिलेसाठी माहेर हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. दिवाळी, भाऊबीज अशा सणांना माहेरी गेल्यावर भावाकडून मिळणारी ओवाळणी हीच या स्त्रियांची तुटपुंजी संपत्ती असते. ज्यावर त्यांना आपला हक्क सांगता येतो.

Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीला पुढचा हफ्ता कधी मिळणार? शपथविधी सोहळ्यात होऊ शकते मोठी घोषणा

याच भावनिक मुद्द्याला महायुतीच्या नेत्यांनी हात घातला आहे. त्यामुळे सत्ता, राजकारण, मुख्यमंत्री, अर्थसंकल्प अशा गोष्टींपासून चार हात लांब राहणाऱ्या राज्याच्या महिलांना अचानकच लाडक्या बहीणीचा दर्जा मिळाल्याने या सगळ्या गोष्टीत रस वाटणं साहजिक होतं.

लाडकी बहीण म्हणवून घ्यायला या महिलांना मनोमन काय वाटतं? मग या पैशांचं त्यांनी काय केलं असेल? याचा उहापोहं करणंसुद्धा तेवढचं गरजेचं आहे. हे माहिती करून घेण्यासाठी या योजनेचा लाभ घेतलेल्या काही महिलांशी चर्चा केली तेव्हा लाडकी बहीण योजना, राजकारण, ही आर्थिक मदत याबद्दल महिलांचे वेगवेगळे विचार समोर आले.

Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojana : धाराशिवमधील २ लाख महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालाच नाही, १ लाख ७६ हजार महिलांनाच ७५०० मिळाले

लाडक्या बहिणींचे आतापर्यन्त मला 7 हजार रुपये माझ्या खात्यावर निवडणूकीच्या आधीच जमा झाले आहे. आतापर्यंत सरकारच्या कुठल्याच योजनेचा लाभ मला भेटलेला नव्हता. मात्र ही योजना माझ्यासाठीच असल्यासारखं वाटलं. महागाई वाढते आहे. त्यात एकीने घर चालवताना दमछाक होते. त्यामुळे या योजनेच्या पैशांनी मला आधार मिळाला. या पैशांतुन मी माझ्या मुलाचा शाळेचा खर्च करू शकले. या पूढेसुद्धा ही योजना कायम चालू ठेवावी अशीच विनंती एक बहीण म्हणून मी सरकारला करते.

पल्लवी नाथ, लाभार्थी महिला.

लग्नानंतर काही दिवस नोकरी केली तोवर स्वत:च्या जुजबी गरजा पूर्ण करता येत होत्या. पुढे मुलाच्या संगोपनासाठी नोकरी सोडावी लागली. त्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याकडे पैसे मागावे लागत होते. आत्तापर्यंतचा शासकीय योजनांचा अनुभव फारसा चांगला नसल्याने लाडकी बहीण योजनेबद्दल समजल्यावर फॉर्म भरताना मनात शंका होतीच, पैसे मिळतील की नाही. पण खात्यावर पैसे जमा झाले तेव्हा फार आनंद झाला. त्यातले काही पैसे घरखर्चासाठी वापरले. उरलेले पैसे अडचणीला कामी येतील म्हणून बाजूला ठेवले आहेत.

धनेश्वरी बनसोड, लाभार्थी महिला.

आमच्या सारख्या गरीबाचं विचार कोण करतं? पण मुख्यमंत्र्यांनी यांच्याबद्दल ईचार केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पैसं आमच्या संसाराला लागलं. त्यामुळं मन शांत झालं, त्यास्नी धन्यवाद द्यावं म्हणून आमी त्यानाच मतदान दिलं. म्हणजे ही योजना पुढं पण असच सुरू राहील अन् आमच्या घराला हातभार लागल.

रुख्मिणी, लाभार्थी महिला.

मी गावाकडून शहरात शिक्षणासाठी आले आहे. घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे या योजनेचा फॉर्म भरला तर काहीशी मदत होईल असं वाटलं. पण पैसे मिळतील की नाही अशी शंका होती. दिवाळी पूर्वीच सगळे पैसे मिळाले. त्यातले काही पैसे मेसच्या डब्ब्यासाठी दिले. माझ्यासारख्या अनेकींना या योजनेमुळे मदत होणार आहे. यापुढेही ही योजना अशीच सुरू राहावी.

आरती मोरे, लाभार्थी तरुणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com