NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

MSRTC ST Bus NCMC Card Update News : महिला प्रवासी आणि ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड नसल्यास अर्ध्या तिकिटाची सवलत मिळणार नाही.
MSRTC NCMC Card For Women
MSRTC NCMC Card For Women AI Image
Published On
Summary
  • १ सप्टेंबरपासून महिला आणि ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या तिकिटाच्या सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य

  • NCMC कार्ड नसल्यास पात्र प्रवाशांकडून पूर्ण तिकीट भाडे आकारले जाऊ शकते.

  • ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सध्या NCMC कार्डच्या सक्तीपासून दिलासा देण्यात आला

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! आता एसटीने प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आज म्हणजेच १ सप्टेंबर पासून हा नवा नियम लागू करण्यात आला असून जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला अर्ध तिकीट मिळणार नाही. त्यामुळे सवलतीच्या दरात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपले NCMC कार्ड आपल्या जवळ ठेवणे गरजेचे आहे.

१.११ कोटी प्रवाशांची NCMC कार्डसाठी नोंदणी

MSRTC कडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्डसाठी आतापर्यंत सुमारे १.११ कोटी प्रवाशांची NCMC कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आहे. कार्डची नोंदणी आणि वितरणाची जबाबदारी महामंडळाने E-Bix Technologies Ltd या कंपनीकडे सोपवली आहे. सध्या या प्रक्रियेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले असून, सरकारी सवलतीसाठी पात्र असलेल्या इतर प्रवर्गांचाही पुढील टप्प्यात NCMC प्रणालीमध्ये समावेश केला जाणार आहे.

MSRTC NCMC Card For Women
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

....तर हाफ तिकीट मिळणार नाही

नव्या नियमानुसार, महिला प्रवाशांसह ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून प्रवास करताना अर्ध तिकीट भरण्यासाठी NCMC कार्डचा वापर करावा लागणार आहे. जर हे कार्ड प्रवाशांकडे नसल्यास तिकीटाची संपूर्ण रक्कम आकारली जाऊ शकते. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी कार्डमध्ये आवश्यक रक्कम उपलब्ध किंवा कार्ड टॉप-अप केलेले आहे, याची खात्री करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी सर्व एसटी आगारांना Standard Operating Procedure (SOP) देखील पाठवण्यात आली आहे.

MSRTC NCMC Card For Women
Fruit Benefits : तुमच्या रक्तातील पेशी कमी होतायत? 'ही' ६ फळे दररोज खा; २ दिवसांत दिसेल रिझल्ट

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

दरम्यान, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तूर्तास दिलासा देण्यात आला आहे. या प्रवर्गासाठी NCMC कार्डची सक्तीची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः बायोमेट्रिकच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा बोटांचे ठसे व्यवस्थित नोंदवले जात नसल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी महामंडळाकडून सवलतीच्या तिकीट व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि पात्र प्रवाशांची पडताळणी अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रवाशांनी अद्याप NCMC कार्डसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या एसटी आगाराशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com