MPSC Success Story
MPSC Success StorySaam Tv

MPSC Success Story: साताऱ्याच्या लेकीची कमाल! सलग तीन वेळा MPSC क्रॅक; पिठाची गिरणी चालवून आईवडिलांनी केलं मोठं

MPSC Success Story of Satara Mohini Gole Kirdat: साताऱ्याच्या मोहिनी गोळे किर्दत यांनी सलग तीन वेळा एमपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी खूप खडतर परिस्थितीतून मार्ग काढत हे यश मिळवलं आहे.
Published on
Summary

साताऱ्याच्या लेकीची यशोगाध

मोहिनी गोळे किर्दत यांनी MPSC परीक्षेत सलग तीनदा मिळवलं यश

वडिलांची पीठाची गिरणी, खडतर परिस्थितीतूनही काढला मार्ग

स्वप्नांना बळ देण्यासाठी फक्त इच्छाशक्ती आणि सातत्य महत्त्वाचे असते. जर तुमची इच्छा असेल आणि त्यादृष्टीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. असंच काहीसं मोहिनी अनिल गोळे-किर्दत यांच्याबाबतीत घडलं. त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा सलग तीन वेळा क्रॅक केली आहे. त्यांच्या या यशाचे त्यांच्या कुटुंबियांना खूपच कौतुक आहे.

मोहिनी या मूळच्या साताऱ्याच्या रहिवासी. त्यांनी अभ्यासाला नेहमीच प्राथमिक स्थान दिले. त्या वालूथ गावात लहानाच्या मोठ्या झाल्या.

MPSC Success Story
Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ४ सुपुत्रांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती; प्रेरणादायी प्रवास वाचा

मोहिनी यांची वडिलांनी पीठाची गिरणी होती. या गिरणीतून होणाऱ्या कमाईतून त्यांचे घर चालायाचे. त्यांची आई लहान मोठी कामे करत संसाराला हातभार लावत. परिस्थिती कशीही असली तरी त्यांनी आपल्या तिन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही.

मोहिनी यांचे शिक्षण

मोहिनी यांनी प्राथमिक शिक्षण हे वालूथ जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. त्यानंतर त्यांनी ८ ते१० वीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिसश स्कूल हुमगाव येथे घेतले. दहावीमध्ये त्यांचा शाळेत पहिला नंबर आला होता. त्यांनी ११ आणि १२वीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सायन्स येथे घेतले.

MPSC Success Story
Success Story: नासामधील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली, यूपीएससी दिली; पाचव्या प्रयत्नात IPS; अनुकृति शर्मा यांचा प्रवास

उच्च शिक्षणासाठी त्यांनी साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. येथे त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती मिळवली.

२०२४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा एमपीएससी परीक्षा पास केली आहे. यानंतर त्यांनी जिल्हा परिषद ठाणे येथे जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मुलीच्या या यशामुळे आईवडिलांना खूपच आनंद झाला आहे.

MPSC Success Story
Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ९ तरुणांची एकाचवेळी सैन्य दलात निवड; गावकऱ्यांनी केला जल्लोष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com