महाराष्ट्रात पेपरफुटीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीय... अन्न व औषध प्रशासनाचा पेपरफुटीत MPSCच्य़ा अधिकाऱ्यांचा हात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कारण अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींमध्ये तीन MPSC अधिकाऱ्यांचा समावेश आहे. MPSCची परीक्षा देणाऱ्या ऋतुजा पाटील या विद्यार्थीनीनं मैत्रिणीसोबत केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे हे प्रकरण कसं समोर आलं...पाहूयात...
व्हॉट्सअॅप चॅटमुळे फुटलं बिंग
मैत्रीण - तू रिझाईन केलंस का?
ऋतुजा - हो, माझी ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा चांगली गेलीय
मैत्रीण - चांगला? तो पेपर तर खूप कठीण असतो, एवढा अभ्यास कसा केलास?
ऋतुजा - कोणाला सांगू नको. मला आधीच प्रश्नपत्रिका मिळाली होती
ऋतुजा - मी 50 लाख भरलेत 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षेसाठी
ऋतुजा - नंदुरबारला 'कौटिल्य फाउंडेशन'चे मालक आहेत प्रवीण पाटील सर. त्यांनी २ दिवस आधीच प्रश्नपत्रिका दिली होती मला
ऋतुजा - प्रवीण पाटील सर भरपूर पेपर फोडतात, पण कधी सापडत नाहीत. एमपीएससीचा पेपरही फोडला
दरम्यान ऋतुजा पाटील आणि तिच्या मैत्रिणीमधील हे संभाषण व्हायरल होण्याआधी ऋतुजाचा बॉयफ्रेंड असणाऱ्या गौरव पाटीलमुळेच पेपरफुटीसंदर्भात MPSC संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती...
24 जुलै 2026
गौरव पाटील या परीक्षार्थीनं मेल द्वारे MPSCचा पेपर फुटल्याची तक्रार केली
मात्र MPSCनं पेपरफुटीचे आरोप फेटाळून लावत उलट अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला...
27 जुलै 2026
तक्ररादार गौरव पाटीलनं पुन्हा परीक्षा देता यावी म्हणून बनाव केल्याचा सांगत MPSCला मेल पाठवून आपली तक्रार मागे घेतली.
प्रेमसंबंधामुळे ऋतुजानं गौरवला कौटील्य अकॅडमीच्या प्रवीण पाटील यांच्याकडून प्रश्नसंच विकत घेतल्याचं सांगितलं..
मात्र ऋतुजा अधिकारी होणार असल्यानं तिच्या घरच्यांनी तिचं लग्न जुळवण्याच्या हालचारी सुरू केल्यानं गौरव आणि ऋतुजामध्ये वाद झाला
ब्रेकअपनंतर गौरवनं रागाच्या भरात ऋतुजानं पेपर विकत घेतल्याची आणि पेपरफुटीची तक्रार MPSCकडे केली
दरम्यान गौरवच्या आरोपानंतर सुरुवातीला पेपरफुटीचा आरोप फेटाळणाऱ्या MPSC कार्यालयाच्या पार्किंगमध्यचे पेपरफुटीचा सौदा झाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय.....MPSCच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या तीन दिवस आधी 19 मार्चला 294 प्रश्नांचा संच तयार केला.... आणि हाच संच कौटिल्यच्या प्रवीण पाटील यांनी तब्बल 20 लाखांत MPSC कार्यालयाच्या पार्किंगमध्ये विकत घेतल्याचाही संशय आहे...त्यामुळे या पेपफुटीप्रकरणात MPSCचेच अधिकारी गुंतल्याचं उघड झालंय.
अटक करण्यात आलेले आरोपी
आता या प्रकरणात पोलिसांनी MPSCचे अवर सचिव अभिजित लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते या MPSCमधील अधिकाऱ्यांना अटक केलीय.. त्याशिवाय कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील जे शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित आहेत त्यांच्यासह तक्रारदार आणि संशयित असणाऱ्या गौरव पाटीलला अटक केलीय...तसचं दुसरीकडे ऋतुजा पाटील आणि कौटील्य अकॅडमीसोबत मध्यस्थी करणारा मयुर ठाकरे हे दोघेही फरार आहेत....
दरम्यान या प्रकरणात सहसचिवाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला... तर तक्रारदार असणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डेनं MPSC पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्विकारून MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केलीय...
राज्यात गेल्या सहा महिन्यात नीट, TET, SRPF आणि आता MPSC या 4 परीक्षांच्या पेपरफुटीची मालिका सुरू आहे.
मात्र ज्या आयोगाकडे मुलांचं भविष्य घ़डवण्याचटी जबाबदारी आहे त्याच आयोगातले अधिकारी पेपर फोडण्यात गुंतले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कुणावर विश्वास ठेवावा हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे य़ा तीन अधिकाऱ्यांच्या मागे आणखी कोणते बडे मासे आहेत त्यांचाही शोध घेऊन याची पाळमुळं शोधण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.