MP Praniti Shinde: सरकार बाहेरून भक्कम आतून पोकळ; राजकोटमधील पुतळा घटनेवरून खासदार प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : अरबी समुद्रात मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे प्रस्तावित आहे. तो पुतळा तुम्ही नाही उभारला नाही, मात्र जो पुतळा आहे त्याची अशा पद्धतीने विटंबना केली गेली, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केलीय.
MP Praniti Shinde: सरकार बाहेरून भक्कम आतून  पोकळ; राजकोटमधील पुतळा घटनेवरून खासदार प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका
Mp Praniti Shinde
Published On

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. यावरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. नवर्निवाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी राजकोट किल्ला घटनेवरून नारायण राणे आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. मालवण येथील पुतळा घटना प्रकरणी सरकारच्या भोंगळ कारभाराविरोधात त्यांनी निषेध मोर्चा काढला. त्यावेळी बोलत असतांना त्यांनी सरकार आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली.

अतिशय खालच्या पातळीला जाऊन जर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरले जातं असेल. अशा पद्धतीने पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली. महाराजांची मूर्ती ही एक जरी प्रतिमा जरी असली तरी त्या मागील या सरकारच्या भावना लक्षात येतात.अतिशय खालच्या पातळीला जाऊन जर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरले जातं असेल आणि अशा पद्धतीने पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.

दोन दिवसापूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला असून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. त्यावरून खासदार प्रणिती शिंदे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केलीय. महाराजांचा पुतळा हा कमकुवत होता हे माहिती होतं तरी मुलाच्या कंत्राटदाराला आणि पंतप्रधान मोदींना खूश करण्यासाठी घाईत अनावरण करण्यात आल्याचं खासदार शिंदे म्हणाल्या.

पुतळा कमकुवत होता, ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं ते केवळ त्यांच्या मुलाला खूश करण्यासाठी देण्यात आलं. पुतळा हा बाहेर भक्कम वाटत होता परंतु आतून मात्र कमकूवत होता. जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता. बाहेरून शोशाप आणि आतून अतिशय पोकळ असं हे सरकार असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केलीय.

पंतप्रधानांना खूश करण्यासाठी तुम्ही त्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केलं गेलं, असा आरोप त्यांनी केलाय. हवेमुळे पुतळा पडला, असं वक्तव्य जर मुख्यमंत्र्यांकडून होत असेल तर जनतेने कोणाकडे पाहायचं. आरबी समुद्रात मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे प्रस्तावित आहे.तो पुतळा तुम्ही नाही उभारणार मात्र जो पुतळा आहे त्याची अशा पद्धतीने विटंबना करता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे. अरबी समुद्रात मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे प्रस्तावित आहे. तो पुतळा तुम्ही उभारत नाहीत. मात्र जो पुतळा आहे, त्याची अशा पद्धतीने विटंबना सरकारकडून केली जात आहे, असं खासदार शिंदे म्हणाल्या.

MP Praniti Shinde: सरकार बाहेरून भक्कम आतून  पोकळ; राजकोटमधील पुतळा घटनेवरून खासदार प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका
Rajkot Fort Rada: मालवणमध्ये तुफान राडा; राजकोट किल्ल्यावरील घटनेवर कोण काय काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com