Akola : 'छत्रपती शिवाजी महाराज कुणबी होते, कुणबी समाजाने देशाला नेतृत्व दिले'; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
nana patole news
nana patole news saam Tv
Published On

Nana Patole News : लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपल्या समाजाचे नेतृत्व तसे राहावे असे वाटणे हे काही गैर नाही. कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यातील एका कार्यक्रमात केले. (Latest Marathi News)

nana patole news
Maharashtra Political News : निर्भया फंडातील पैशांचा मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापर? राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप

अकोला जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे कुणबी समाजाच्या कार्यक्रम ठिकाणी नाना पटोले (Nana Patole) हे माध्यमांशी बोलत होते. नाना पटोले पुढे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य कसे असावे याचे राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी समाज हा अन्नदाता आहे, देशाचा पोशिंदा आहे'.

'राज्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या तुम्ही करू नका. ज्या व्यवस्थेने तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, त्या व्यवस्थेला आत्महत्या करण्यास तुम्ही भाग पाडा, असे आवाहन करण्यासाठी मी इथे आलो आहे, असे ते म्हणाले.

nana patole news
Supriya Sule : 'कायदा आता गृहमंत्री फडणवीसांच्या म्हणण्यानुसार चालतो'; शाईफेक प्रकरणावरून सुप्रिया सुळे असे का म्हणाल्या?

'कुणबी समाज, ओबीसी समाजामध्ये माझ्यापेक्षा ही अनेक नेतृत्व आहेत. काय असतं की वेळ आणि नशीब हे प्रत्येकाचे कसे असते हे त्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाला समाजाचे देणे लागते. प्रत्येकाची समाजासाठी कार्य करण्याची जबाबदारी असते, असे नाना पटोले पुढे म्हणाले.

'माझ्या अपेक्षा काय असतील या पेक्षा माझ्या समाजाच्या व ओबीसी समाजाच्या अपेक्षा काय आहे, यासाठी काम करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून काम करण्याचा नाना पटोले यांचा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com