Bhaskar Jadhav : राणेंच्या टीकेवरुन भाजप खासदार म्हणाले, 'ते भास्कर नव्हे बाष्फळ जाधव'

आमदार भास्कर जाधव यांनी कुडाळात राणे कुटुंबियांवर मंगळवारी जाेरदार टीका केली हाेती.
Dr. Anil Bhonde, Bhaskar Jadhav, Amravati, Shivsena, Narayan Rane
Dr. Anil Bhonde, Bhaskar Jadhav, Amravati, Shivsena, Narayan Ranesaam tv

- अमर घटारे

Bhaskar Jadhav : आमदार भास्कर जाधव हे सातत्याने कोणाचीही मिमिक्री करत असतात. याचे परिणाम त्यांना विधानसभेत भोगावे लागले आहे. यापूर्वी त्यांना माफी सुद्धा मागावी लागली होती. खरं तर ते भास्कर जाधव (bhaskar jadhav) नसून बाष्फळ जाधव आहेत अशी टीका खासदार अनिल बाेंडे (Anil Bhonde) यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर अमरावती (amravati) येथे माध्यमांशी बाेलताना केली. (Amravati Latest Marathi News)

शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर अर्वाच्छ शब्दात टीका केली. या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर देत भास्कर जाधव यांना आरसा दाखवला आहे. डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले ते भास्कर जाधव नसून बाष्फळ जाधव आहेत. (Breaking Marathi News)

Dr. Anil Bhonde, Bhaskar Jadhav, Amravati, Shivsena, Narayan Rane
Chiplun : राणे बंधूंवर गुन्हा दाखल करा; शिवसैनिकांचा चिपळूण पाेलिस ठाण्यात राडा

डाॅ. भाेंडे म्हणाले भास्कर जाधव हे सातत्याने कोणाचीही मिमिक्री करत असतात. याचे परिणाम त्यांना विधानसभेत भोगावे लागले आहे. यापूर्वी त्यांना माफी सुद्धा मागावी लागली होती. त्यामुळे त्यांनी हे धंदे सोडावे. आपणच कसे खरे शिवसैनिक (shivsainik) आहोत हे दाखवण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. मात्र त्यांनी अंतर्मुख होऊन आपणही धुतल्या तांदळाचे नसून शेकडो पक्ष बदलून आता शिवसेनेत (shivsena) आलो आहोत हे विसरु नये असेही खासदार बोंडे यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Dr. Anil Bhonde, Bhaskar Jadhav, Amravati, Shivsena, Narayan Rane
Sindhudurg : शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पेटणार ? राणेंचे 'ते' वक्तव्य आमदार नाईकांच्या जिव्हारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com