Satbara Documents: महत्वाची बातमी! सातबारा उताऱ्यावर लागणार आईचेही नाव; १ नोव्हेंबरपासून नव्या नियमाची अंमलबजावणी

Mother Name On Satbara Documents: १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावाने जमीन खरेदी केल्यास सातबारा उताऱ्यावर अर्जदारासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
Satbara Documents: महत्वाची बातमी! सातबारा उताऱ्यावर लागणार आईचेही नाव; १ नोव्हेंबरपासून नव्या नियमाची अंमलबजावणी
Mother Name On Satbara Documents:Saamtv
Published On

Mothers Name On Satbara: सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्याही नावाचा समावेश असेल असा मोठा निर्णय राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर आईचेही नाव टाकणे बंधनकारक असणार आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Satbara Documents: महत्वाची बातमी! सातबारा उताऱ्यावर लागणार आईचेही नाव; १ नोव्हेंबरपासून नव्या नियमाची अंमलबजावणी
Maharashtra Politics : भाजपचा विरोध, महायुतीत वादाचा 'बुरखा'; शिंदेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतांचा धसका? वाचा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरकारी कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या नावासोबत आईचेही नाव बंधनकारक असेल, असा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या बालकांच्या कागदपत्रांमध्ये वडिलांसह आईचेही नाव असेल, असे या नव्या निर्णायानुसार स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव बंधनकारक असणार आहे.

१ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावाने जमीन खरेदी केल्यास सातबारा उताऱ्यावर अर्जदारासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.

Satbara Documents: महत्वाची बातमी! सातबारा उताऱ्यावर लागणार आईचेही नाव; १ नोव्हेंबरपासून नव्या नियमाची अंमलबजावणी
Raigad Crime News: तीन तरुणांमध्ये वाद अन् एकाची निर्घृण हत्या, भयंकर घटनेने रायगड हादरलं; हल्लेखोर फरार

दरम्यान, सातबारा उताऱ्यावर वडिलांचे नाव बंधनकारक नसेल. तसेच पुढे यामध्ये फेरफार केल्यासही आईचे नाव लावण्यात येणार आहे. विवाहित महिलांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार या निर्णयामधील त्रुटींचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना करण्यात आल्या. आता १ नोव्हेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल.

Satbara Documents: महत्वाची बातमी! सातबारा उताऱ्यावर लागणार आईचेही नाव; १ नोव्हेंबरपासून नव्या नियमाची अंमलबजावणी
Vanraj Andekar Death Case: साक्षीदार शिवम आंदेकरला मारण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून संरक्षण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com