Saam Impact News | सामचा दणका! साताऱ्याच्या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी होणार
कोयना जमीन प्रकरणात आता प्रांतअधिकारी कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रांतअधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. साताऱ्याच्या कांदाटी खोऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडानी गावात उच्च पदस्थ अधिकाऱ्याने ही जमीन विकत घेतली होती. 13 लोकांनी जवळपास 640 एकर कवडीमोल भावात विकत घेतली होती. ही जमीन निसर्ग आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशिल आहे. त्यामुळे या व्यव्हारातील वृक्षतोड आणि उत्खनन सारख्या अनेक मुद्द्यांवर चौकशी करण्य़ात आली. या चौकशीत एका अधिकाऱ्यासह तीन लोक दोषी आढळल्याचं दिसून आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.