Delhi High Court: शैक्षणिक प्रमाणपत्रांवर वडिलांसोबत आईचेही नाव लावा: दिल्ली हायकोर्ट

Delhi High Court: शैक्षणिक प्रमाणपत्रांवर विद्यार्थ्यांच्या नावासोबत फक्त वडिलांचे नाव नाही तर आईचेही नाव असावे असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलाय.
Delhi High Court
Delhi High CourtSakal
Published On

Mother Name In Education Certificate Delhi High Court:

दिल्ली हायकोर्टाने आज शैक्षणिक प्रमाणपत्राविषयी मोठा निर्णय दिलाय. यापुढे शैक्षणिक प्रमाणपत्रांवर वडिलांसोबत आईचेही नाव लिहावे असा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिलाय. प्रमाणपत्रावर आईचे नाव असावे यासंदर्भात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिलाय. (Latest News)

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक प्रमाणपत्रांमध्ये आणि पदवींमध्ये फक्त वडिलांच्या नावाचा उल्लेख करणं योग्य नाहीये, असं उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना म्हटलंय. प्रमाणपत्राच्या मुख्य भागावर दोन्ही पालकांची नावे अनिवार्यपणे प्रतिबिंबित करणे आवश्यक असल्याचं न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने म्हणाले. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याची याचिका स्वीकारत न्यायालयाने गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाला २ आठवड्यांच्या आत नवीन पदवी जारी करण्याचे निर्देश दिलेत.

ज्यावर वडिलांचे तसेच आईचे नाव नमूद करावे, अशा निर्देश न्यायालयाने दिलेत. ६ जून २०१४ च्या युजीसीच्या परिपत्रकाचे पालन केल्याचे लक्षात घेत न्यायालयाने सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, पदव्या आणि तत्सम कागदपत्रांवर विद्यार्थ्याच्या आई आणि वडिलांचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. यासंदर्भात कोणते स्वरूप स्वीकारायचे हे ठरवण्याचे काम विद्यापीठाचे असणार असल्याचे न्यायालयाने म्हटलंय.

पदवी आणि प्रमाणपत्रांमध्ये वडिलांचे आई-वडील आणि आईच्या वडिलांचे किंवा आईच्या पतीचे नाव नमूद करणे आवश्यक आहे का, यावर विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने यूजीसीला दिलेत. यावर निर्णय देताना न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलं की, लिंगाच्या आधारावर मानसशास्त्रीयदृष्ट्या मानवांमध्ये विभागणी करणंही ‘कालबाह्य’झालेली गोष्ट आहे. तसेच अनेक मुली कायद्याचे शिक्षण घेत आहेत. लॉ स्कूलमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ७० टक्के मुली आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचं खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना म्हटलंय.

Delhi High Court
Calcutta High Court : सावधान! अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हटल्यास होऊ शकते तुरुंगवारी; जाणून घ्या हायकोर्टाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com