

दुपारची वेळ होती. कडक ऊन पडलं होतं. मायलेकी कपडे धुण्यासाठी गावाजवळच्या पाझर तलावावर गेल्या. अचानक लेकीचा पाय निसटला आणि ती पाण्यात पडली. ती पाण्यात बुडू लागली. वाचवण्यासाठी धावा करू लागली. काठावरच असलेल्या आईनं जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. मुलीला वाचवताना ती देखील बुडाली. दोघींचाही करूण अंत झाला. मायलेकीच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरीत ही दुर्दैवी घटना घडली. सत्वला संतोष जाधव आणि मुलगी मंजू संतोष जाधव असं बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी मायलेकींची नावं आहेत. या दोघी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी मणेराजुरीजवळील चिमणखोरा पाझर तलावावर गेल्या होत्या.
मंजू जाधवचा अचानक पाय निसटला आणि ती तलावात पडली. खोल पाण्यात गेल्यामुळं ती बुडू लागली. तिनं धावा केला. आईनं क्षणाचाही विचार न करता जीवावर उदार होऊन मुलीला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. मुलीला वाचवताना सत्वलाही पाण्यात बुडाली. दोघी मायलेकीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने मणेराजुरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.
तिरोडा तालुक्यातही दुर्दैवी घटना घडली. बोदलकसा जलाशयात नौकाविहारासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. या ठिकाणी नऊ मुलांचा गट फिरायला गेला होता. त्यानंतर ते जलाशयात नौकाविहारासाठी गेले. त्यातील दोन मुले जलाशयात बुडाली. मोहित रहांगडाले आणि कुणाल भोडे अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघेही बरबसपुरा येथील रहिवासी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.