Monsoon Update: महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रतीक्षा कायम! विदर्भात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather: महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झालेली नाही. नागरिक आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यातच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra monsoon delay
Maharashtra monsoon delaygoogle
Published On

राज्यातल्या नागरिकांसाठी ही अत्यंत महत्वाची आहे. जून महिला आला तरी नागरिकांना मान्सूनची वाट पाहावी लागतेय. अरबी समुद्रात येणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना अपेक्षित बळ मिळालं नाही म्हणून महाराष्ट्रातली मान्सूनची प्रगती मंदावली आहे. त्यामुळे बऱ्याच भागामध्ये पाऊस लांबला आहे. तर उकडा आणि तापमानात वाढ झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने आज १४ जून रोजी विदर्भातल्या काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं आणि उन्हापासून बचाव करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Maharashtra monsoon delay
Chanakya Niti: बँक खात्यात पैसा टिकवायचा असेल तर या 5 ठिकाणी बना महाकंजूस, आचार्य चाणक्यांनी दिला खास सल्ला

दरम्यान, कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील अशक्य आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उष्णतेसोबतच काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. या भागांत काही प्रमाणात पाऊस पडू शकतो.

Maharashtra monsoon delay
Skin Care Tips: स्कीन नेहमीच चमकत राहील, फॉलो करा त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितेलं सिक्रेट रुटीन

देशातील मॉन्सूनच्या प्रगतीबाबत पाहिले तर मॉन्सूनने पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. पण महाराष्ट्राकडे अजुनही पावसाची हजेरी होईल. अरबी समुद्रातले वातावरण अनुकूल नसल्यामुळे राज्यातल्या मॉन्सूनचं आगमन आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com