Sakshi Sunil Jadhav
महागड्या वस्तू खरेदी करून किंवा श्रीमंतीचे प्रदर्शन करून मिळणारी प्रतिष्ठा फार काळ टिकत नाही. चाणक्यांच्या मते, फक्त इतरांना प्रभावित करण्यासाठी केलेला खर्च आर्थिक नुकसान ठरू शकतो.
समाजात मोठे दिसण्यासाठी अनेकजण गरजेपेक्षा जास्त खर्च करतात. अशी प्रतिष्ठा आपल्या व्यक्तिमत्त्वावर नाही तर पैशांवर उभी असल्याने ती टिकाऊ नसते.
जे लोक समोर गोड बोलतात आणि मागे टीका करतात, त्यांच्यावर पैसा खर्च करणे टाळा. चाणक्यांच्या मते, अशा व्यक्ती संकटाच्या काळात मदत करत नाहीत.
समाजाच्या दबावामुळे अनेकजण लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये वायफळ खर्च केला जातो. पण समाज त्याची जबाबदारी घेत नाही.
इतरांची प्रशंसा मिळवण्यासाठी किंवा स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी पैसा खर्च करणं योग्य नाही. चाणक्य सांगतात की, चापलुसीवर आनंद मानणाऱ्या व्यक्तीचा शेवटी तोटाच होतो.
मोठी सूट मिळत असल्याचं पाहून अनेकजण गरज नसलेल्या वस्तू खरेदी करतात. यामुळे बचत होत नाही, उलट अनावश्यक खर्च वाढतो.
एखादी वस्तू खरोखर आवश्यक आहे का? याचा विचार करूनच खर्च करा. विचारपूर्वक केलेली खरेदी दीर्घकाळ आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत करतं.
रोज बचत केल्याने भविष्यातल्या अडचणींना सामोरं जाणं सोपं होतं. चाणक्यांच्या मते, संपत्ती निर्माण करण्यासाठी बचतीची सवय अत्यंत महत्त्वाची आहे.