Maharashtra Monsoon Update - या वर्षी मान्सून (Monsoon) वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, हवामान खात्याचा हा अंदाज काहीसा चुकला असल्याचे चित्र दिसून येत आहे. कर्नाटकात दाखल झालेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. त्यामुळे आता 12 ते 13 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्याची शक्यात आहे. (Monsoon Latest Marathi News)
हे देखील पाहा -
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची तडाखा कायम आहे. विदर्भात काही भागांत पुढील २ ते ३ दिवसांत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नेहमीच्या तुलनेत यंदा उन्हाचे चटके काहीसे अधिकच जाणवले. त्यामुळे आता नागरिक मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहत आहेत. मात्र मान्सून अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे आता राज्यात मान्सून 12 ते 13 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.