Akola: बियाणे महोत्सव ठरला शेतकऱ्यांसाठी वरदान; कंपन्यांच्या घशात जाणारी रक्कम शेतकऱ्यांच्या घरात

या बियाणे महोत्सवात तब्बल 29 कोटी रुपयाची उलाढाल झाली आहे.
Akola: बियाणे महोत्सव ठरला शेतकऱ्यांसाठी वरदान; कंपन्यांच्या घशात जाणारी रक्कम शेतकऱ्यांच्या घरात
Published On

अकोला- राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची संकल्पना असलेला बियाणे महोत्सव अकोल्यातील (Akola) शेतकऱ्यांना वरदान ठरला आहे. या बियाणे महोत्सवात तब्बल 29 कोटी रुपयाची उलाढाल झाली आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांच्या घशात जाणारे शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्याच घरात गेले आहेत.

हे देखील पाहा -

राज्यासह अकोला जिल्ह्यात यावर्षी महाबीज सह खाजगी कंपन्यांच्या बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यातल्या त्यात बियाण्यांच्या किंमती ही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशा काळात शेतकऱ्यांना आशादायी ठरला अकोल्यातील बियाणे महोत्सव या शेतकऱ्यांचं पीक थेट बियाणे म्हणून विकण्यात आले. महोत्सवात तब्बल 21 हजार 17 क्विंटल बियाण्यांचे बुकिंग होऊन 10 हजार 173 क्विंटल बियाणे विक्रीतून तब्बल 29 कोटी 13 लक्ष 52 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. त्यामुळे बियाणे कंपनीच्या खिशात जाणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्याच घरात गेल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.

Akola: बियाणे महोत्सव ठरला शेतकऱ्यांसाठी वरदान; कंपन्यांच्या घशात जाणारी रक्कम शेतकऱ्यांच्या घरात
नंदुरबारला दूषित पाणी पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात? पालिकेने केले 'हे' आवाहन

शिवाय बियाणे ही उत्कृष्ट आणि पाहिजे ते मिळाल्याने बियाणे महोत्सव खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात यापेक्षाही मोठा महोत्सव घेऊन राज्यस्तरावर हा महोत्सव राबविण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली. आधीच बियाणे तुटवडा आणि महागाई यामुळे शेतकरी हवालदिल झाला. ऐन खरिपाच्या तोंडावर अडचणीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे महोत्सव खऱ्या अर्थाने वरदान ठरला असंच म्हणावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com