नंदुरबारला दूषित पाणी पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात? पालिकेने केले 'हे' आवाहन

विरचक धरणाच्या मृतसाठ्यातून नंदुरबारला पाणीपुरवठा
Nandurbar News
Nandurbar NewsSaam Tv
Published On

नंदुरबार - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे पिवळसर रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. जलजन्य आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

विरचक धरणात गेल्या पावसाळ्यात पाणीसाठा उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे वर्षभर पालिकेला पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागली. असे असले तरी शहरवासीयांना नियमित पाणी मिळेल या दृष्टीने नियोजन करण्यात आले. आता विरचक प्रकल्पातील पाणीसाठा अल्पप्रमाणात झाला आहे. प्रकल्पातील मृत साठ्यातूनच पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे पिवळसर रंगाचे पाणी नळांना येत आहे.

हे देखील पाहा -

पालिकेकडून पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनेशनची प्रक्रिया करण्यात येऊनच पाणीपुरवठा होत असला तरी नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. येत्या काळात देखील प्रकल्पातील तेच पाणी शहराला पुरवावे लागणार आहे. निसर्गाची कृपा झाली तर जुलै महिन्यात प्रकल्पातील पाणीसाठा वाढू शकतो.

अन्यथा ऑगस्ट अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात पाणी जपून वापरावे लागणार आहे. पालिकेतर्फे नळांना येणारे पाणी नागरिकांनी गाळून व उकळूनच त्याचा पिण्यासाठी वापर करावा. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनदेखील पालिकेतर्फे मुख्याधिकारी बागुल यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com