Devendra Fadnavis: एकनाथ खडसेंच्या नातीसोबत छेडछाड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Molestation case: रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची काही टवाळखोरांनी छेड काढली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSaam Tv News
Published On

जळगावातील मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची काही टवाळखोरांनी छेड काढली होती. यावर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहे.

अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. ' एकनाथ खडसे यांच्या नातीवर छेडछाड करणारे आरोपी एका विशिष्ट पक्षाचे आहेत', अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

'पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे, इतरांचा शोध सुरू आहे'. अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे. 'आरोपींना माफी देता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई होईल', असंही फडणवीस म्हणालेत.

Devendra Fadnavis News
Snake Attack: पती-पत्नी झोपले होते, अचानक मध्ये आला साप; पुष्पाचा जीव गेला

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

'दुर्देवाने या प्रकरणात विशिष्ट पक्षांचे काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केलंय. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. काहींना अटक देखील झालेली आहे. इतरांनाही अटक होईल. पण अशा प्रकारे छेडछाड करणं, सार्वजनिक ठिकाणी त्रास देणं, अत्यंत चुकीचं आहे.

कुठल्याही परिस्थिती अशा लोकांना माफी देता कामा नये. आरोपींवर अतिशय कडक कारवाई होईल', अशा शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis News
Beed News: वाल्मीक कराडच्या कोठडीतील CCTV कॅमेरे बंद का? देशमुख कुटुंबाचा सवाल, जेलमध्ये नक्की काय घडतंय?

रक्षा खडसेंच्या घरी अधिकाऱ्यांची बैठक

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना घडल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कोथळी येथील घरी अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. बैठकीला विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित आहेत.

राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन अधिग्रहण संदर्भात देखील चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि शरदचंद्र पवार गटाच्या आमदार एकनाथ खडसे एकाच ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com