Legislative Assembly Election: मनसे विधानसभेत 200 ते 225  जागा लढणार? राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक
MNS Vidhan Sabha ElectionSaam Tv

Legislative Assembly Election: मनसे विधानसभेत 200 ते 225 जागा लढणार? राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक

MNS Vidhan Sabha Election: राज ठाकरे यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय. आम्ही विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती मनसे नेते वैभव खेडेकर यांनी दिलीय.
Published on

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे, महायुतीचं टेन्शन वाढवणारी. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिलाय. मनसेने विधानसभेच्या सर्व 288 जागांची आढावा घेतला असून मनसे 200 ते 250 जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर आलीय. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची तयारीत करत असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे 200 ते 225 पर्यंत जागा लढणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिलीय. त्याचदरम्यान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची २५ जुलै रोजी रंगशारदा येथे बैठक बोलवलीय.

राज्यातील सर्वच विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन सव्वा 200 पर्यंत जागा लढण्याचा विचार मनसेचा आहे. या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचा दौरा देखील करणार आहेत. राज्यात सध्या उमेदवारांची चाचपणीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी दिली. खेडेकर यांच्या विधानानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलीय.

बैठकीत राज ठाकरे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान खेडेकर यांनी केल्या विधानानंतर राज ठाकरे एकला चलो रे च्या भूमिका घेणार की महायुतीला समर्थन देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

दरम्यान मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती देतांना वैभव खेडेकर म्हणाले, राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा राज ठाकरेंनी घेतलाय. आम्ही विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. सोबतच आमच्यातले अनेक चेहरे हे विधानसभा निवडणूक लढवतील. महाराष्ट्रात मनसेला आशादायी चित्र आहे, हे एकंदरीत आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं.

288 जागांचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातील सव्वा 200 जागा लढवण्यात येणार आहे. येत्या 25 तारखेला राज्यातील सर्व पदाधिकारी यांचा मेळावा मुंबईत होणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यादरम्यान राज साहेबांचा राज्यात दौरा होईल, असेही खेडेकर म्हणालेत.

दरम्यान विधानसभानिहाय मनसेने निरिक्षक नेमले होते. त्या निरिक्षकांकडून मतदारसंघाचा आढावा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. राज ठाकरेंकडून नेते, पदाधिकाऱ्यांच्या मॅरोथॉन बैठकाही सुरू आहेत. त्यात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दिला जातोय.

Legislative Assembly Election: मनसे विधानसभेत 200 ते 225  जागा लढणार? राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक
Raj Thackeray News : आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार? राज ठाकरे म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com