MNS vs BJP: दिन तुम्हारा, मैदान तुम्हारा, वक्त तुम्हारा; मनसे नेत्याचं भाजप खासदाराला आव्हान, मनसे-भाजप वाद टोकाला

MNS Leader Challenges BJP MP Nishikant Dubey: मनसे नेत्यानं भाजप खासदार निशिकांत दुबेला आव्हान दिलंय. तुम्ही वेळ, जागा सांगावी आपण तेथे येऊ असं म्हटलंय. दरम्यान हिंदी-मराठी भाषेवरून भाजप खासदार आणि मनसेमध्ये शाब्दिक वाद सुरू झालाय.
MNS vs BJP:
MNS Leader Challenges BJP MP Nishikant Dubeysaam Tv
Published On

हिंदी भाषेवरून भाजप आमदार निशिकांत दुबे आणि मनसेमधील वाद शिगेला पोहोचलाय.राज ठाकरेंसंदर्भात दुबे बरळल्यानंतर आता मनसे नेत्याकडून त्यांना आव्हान दिलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आव्हान दिलंय.राज ठाकरे आमचे सेनापती आहेत. मी राज ठाकरेंचा सैनिक आहे. मी त्याच्या एक पाऊल पुढे गेलो आहे. निशिकांत दुबे हिंदी भाषिक आहेत, त्यांना समजावे म्हणून हिंदीत बोलतो, निशिकांत दुबेजी, दिन तुम्हारा, मैदान तुम्हारा, वक्त तुम्हारा,कहाँ आऊ ये बताओ, कौन किसको पटक पटक के मारता हैं, ये दुनिया देखेगी, अशा भाषेत प्रकाश महाजन यांनी दुबे यांना आव्हान दिलंय.

निशिकांत दुबे मराठी माणसाला आपटून मारेन आणि आमचे मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. ते १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. बाकी कुणाची हिंमत नाही, हिंमत फक्त मनसैनिक दाखवू शकतो. परप्रांतीय येऊन येथे आमदार होतो आणि तो आम्हाला मराठीचे धडे द्यायला सुरुवात करतो. हे दुर्दैव आहे, मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत आहे. मराठी माणसाने तुम्हाला आपलेसे केले. तुम्हीच मराठी माणसाला असे बोलता, अशी खंतही प्रकाश महाजन यांनी बोलून दाखवलीय.

MNS vs BJP:
Maharashtra Politics: अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? काही ठळक मुद्द्यांवरून जाणून घ्या तथ्य

आमच्याच राज्यात मराठीची अवहेलना सुरूय. कुणीही उठावे आणि मराठीला नावे ठेवावीत. मी मराठी बोलणार नाही, असे सांगतात. तुम्ही येथे राहता. महाराष्ट्राच्या मातीत कावळा हादेखील मराठीत बोलतो. तुम्ही तर माणसे आहात, असं प्रकाश म्हणालेत. दरम्यान निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंना टोला मारताना मराठी माणसाला पटकून पटकून मारू, असं म्हटलं होतं. राज ठाकरेंनी त्याला मीरा-भाईंदरमधील सभेतून उत्तर दिलं.

MNS vs BJP:
'मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे..' राज ठाकरेंच्या ओपन चॅलेंजवर निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया | MNS v/s BJP

निशिकांत दुबेला आपला धमकी समजावी यासाठी त्यांनी हिंदीतून संवाद साधत दुबेला आव्हान दिलं होतं. त्याला उत्तर देताना आपण राज ठाकरेंना हिंदी बोलायला लावलं असं दुबे बोलून लागले. त्यावर प्रकाश महाजन यांनी भाष्य केलंय. राज ठाकरेंच्या वडिलांनी मोहम्मद रफींकडून मराठीत गाणी गाऊन घेतलंय. त्यामुळे तू आम्हाला भाषा शिकवू नको. आमचा भाषेला विरोध नसल्याचंही प्रकाश महाजन म्हणालेत.

निशिकांत दुबे नंतर आता मराठी-हिंदी भाषेच्या वादात केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे यांनी उडी मारली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांनाच चॅलेंज केलंय. सतीश दुबे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरेंना त्यांनी थेट चॅलेंज केलंय.

सतीश दुबे यांनी राज ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतात या मुद्द्यावरून देखील प्रश्न उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com