MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

Businessman Sparks MNS Outrage: सुशील केडिया यांच्या 'मी मराठी शिकणार नाही' या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली असून मनोज चव्हाण यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. मराठी अस्मिता पुन्हा पेटली आहे.
Raj Thackeray Angry On  Hindi Language
Raj Thackeraysaam Tv
Published On

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात त्रिभाषा धोरणावरून निर्माण झालेला मराठीचा मुद्दा चांगलाच तापला. यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने दोन्ही जीआर रद्द करून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सुशील केडीया यांनी केलेल्या पोस्टमुळे वातावरण अजूनच चिघळलं आहे. त्यांनी पोस्टमधून थेट मनसे प्रमुख राज ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलंय.

'मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोल..' असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. यावरून मनसे सैनिक आक्रमक झाले असून, मनसे नेते मनोज चव्हाण यांनी "सुशील केडिया यांच्यावर अॅक्शन घेतली जाईल" असा थेट इशारा दिला आहे.

'मी मराठी शिकणार नाही, काय करायतं ते करा' सुशील केडियांच्या वादग्रस्त विधानानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. 'राजकारणात सध्या ज्या गोष्टी सुरू आहेत, त्यात मराठीचा विषय काढून काही लोक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात, फेमस होण्यासाठी हे सगळं चाललंय. पण हे आम्ही खपवून घेणार नाही', असं मनोज चव्हाण म्हणाले.

Raj Thackeray Angry On  Hindi Language
Nagpur Crime: नागपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

सुशील केडियांवर संताप व्यक्त करत चव्हाण म्हणाले, 'मराठी भाषेवर कुणी काही बोलत असेल तर, त्याच्या कानाखाली जाळ काढणार. महाराष्ट्रात राहायचं आणि मराठी नाकारायचं हे अजिबात सहन केलं जाणार नाही. मराठी येत नसेल तर शिकून घ्या. पुन्हा मराठी भाषेवर बोलाल तर, कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही', असा थेट इशाराही यावेळी मनोज चव्हाण यांनी दिला.

Raj Thackeray Angry On  Hindi Language
कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

'सुशील केडिया कोण आहे? उद्या ५ जुलैचा कार्यक्रम होऊन जाऊ दे, त्यानंतर काय करायचं ते आम्ही ठरवू. त्यांनी त्याचं अॅक्शन दाखवलं आता आमचं रिअॅक्शन दाखवण्याची वेळी आली आहे', असं म्हणत मनोज चव्हाण यांनी सुशील केडियाचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, या प्रकरणानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून उठणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com