अमित ठाकरेंसह २५ जणांवर पुण्यात गुन्हा; प्राचार्यांच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई, आरोप काय?

Amit Thackeray : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वादानंतर अमित ठाकरे आणि २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी का गुन्हा दाखल केलाय ते जाणून घ्या.
Amit Thackeray  :
AMIT THACKERAY BOOKED IN PUNE: FIR FILED AGAINST 25 OTHERS OVER GOVERNMENT COLLEGE ROWSaam Tv
Published On
Summary
  • अमित ठाकरे आणि २५ जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मोदींच्या फोटोवरून वाद निर्माण झाला होता.

  • विनापरवानगी प्रवेश आणि प्राचार्यांना धमकीच्या आरोपांनंतर गु्नहा दाखल करण्यात आलाय.

सचिन जाधव,साम प्रतिनिधी

पुणे दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील पंतप्रधान मोदींचा फोटो काढला होता, यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. अखेर प्रचार्यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये अमित ठाकरे सह २५ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसोबत होता. मोदींचा फोटो त्या रांगेत का लावला, अशी विचारणा करत अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो तेथून हटवण्यास सांगितलं. त्यानंतर भाजपनं त्यांच्यावर टीका केली असून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावरून माध्यमांशी बोलताना अमित ठाकरेंनी आपल्या नावावर गुन्हा दाखल झाला तर आनंद होईल अशी प्रतिक्रिया दिली होती. याआधीही माझ्यावरती गुन्हा दाखल आहे. दुसऱ्यांदाही मी छत्रपती महाराजांसाठी गुन्हा दाखल होत असेल तर आनंद आहे, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com