MLC Election: पदवीधर निवडणुकीत महायुतीत फूट? युतीतील तीन मित्र आमनेसामने

MLC Election: विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची तीन मित्र आमनेसामने आलेत.
MLC Election: पदवीधर निवडणुकीत महायुतीत फूट? युतीतील तीन मित्र आमनेसामने
MLC Election

गिरीश निकम, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात विधान परिषदेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणा-या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उमेदवार जाहीर केला आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांसमोर आले आहेत. पाहूया एक रिपोर्ट..

लोकसभा निवडणूक निकालानंतर जून महिन्यातच आणखी एका निवडणुकीमुळे राजकीय धुरळा उडणार आहे. विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक होत आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत नसणार आहे. तर महायुतीतले तीन मित्र पक्ष एकमेकांविरोधात मैदानात उतरले आहेत. मनसेने कोकणातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं संजय मोरे यांना उमेदवारी दिली. यामुळे कोकणात तिंरगी लढत रंगणार आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली वेगळी वाट धरली. भाजपचे आमदार असलेल्या या जागेवर आधी मनसेने आपला उमेदवार जाहीर केला. अभिजीत पानसे यांना मनसे उमेदवारी दिल्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांचे तिकीट कापले जाणार की काय? अशी चर्चा सुरु झाली. परंतु भाजपने त्यांचे तिकीट जाहीर केले.

कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. निरंजन डावखरे दोन वेळा या ठिकाणावरुन आमदार झाले आहेत. यामुळे भाजप या जागेवरुन आपला हक्क सोडू इच्छित नाही. त्यानंतर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनाही कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली.

विधान परिषदेच्या या चार जागांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि एकनाथ शिंदेंच्या अतिरीक्त मदतीमुळे यंदाही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती. पण ऐनवेळी राज ठाकरे आणि शिंदे गटानं उमेदवार जाहीर केल्यामुळे तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.

MLC Election: पदवीधर निवडणुकीत महायुतीत फूट? युतीतील तीन मित्र आमनेसामने
Loksabha Election: कोल्हापूरमध्ये सतेज पाटील ठरणार किंगमेकर? कोल्हापुरात कुणाचा कंडका पडणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com