MLC Election: डॉ.राजेंद्र विखेंसह नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून १५ उमेदवारांची माघार, अशी असेल लढत

Nashik Teachers constituencies Election: नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी दाखल केलेल्यापैकी तब्बल १५ जणांनी माघार घेतलीय. याआधी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यात काल ४ जणांनी तर आज ११ उमेदवारांनी माघार घेतली.
MLC  Election: डॉ. राजेंद्र विखेंसह नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून १५ उमेदवारांची माघार, अशी असेल लढत
Nashik Teachers constituencies Election Saam Tv

सचिन बनसोड, साम प्रतिनिधी

नाशिक: लोकसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असून नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रंगत मोड येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे पाटीलसह १५ उमेदवारांनी माघार घेतलीय. यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गट,शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

एकीकडे राज्यात लोकसभेप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील प्रत्येक पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत, यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जूनला मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी होणार आहे.

आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मविआतील नेते एकमेकांशी चर्चा करून आपले उमेदवार मागे घेतले. तर महायुतीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा समन्वय दिसत नाहीये. यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठिकठिकाणी बंडखोरी झाली होती. दरम्यान आज अपक्ष उमेदवार राजेंद्र विखे आणि धनराज विसपुते यांनी माघार घेतलाय. मात्र निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील तिन्ही पक्षाचे उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागलंय.

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे, धनराज विसपुतेंनी आपले उमेवारी माघारी घेतलीय.या दोघांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता महायुतीत शिंदे गट शिवसेनेचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे अॅडव्होकेट महेंद्र भावसार आणि भाजपचे विवेक कोल्हे निवडणुकीच्या आखाड्यात कायम आहेत.

राजेंद्र विखे यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि महायुतीचा धर्म पाळावा, असं आवाहन राजेंद्र विखेंचे बंधू राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले होते. त्यानंतर राजेंद्र विखे यांनी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून माघार घेतली. माघार घेतल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत माघार घेतल्यानंतर राजेंद्र विखे पाटील यांची सोशल मीडियावर पोस्ट लिहिलीय. या पोस्टमधून त्यांनी बंधू राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत नाराजी व्यक्त केलीय.

नाशिक शिक्षक मतदारसंघात आता महायुतीचे उमेदवार दराडे आहेत, त्यामुळे मला त्यांच्यासाठी काम करावं लागेल,म्हणून राजेंद्र विखे यांना माघार घेण्याची विनंती केल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. तर आता नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे संदीप गुळवे,महायुतीचे किशोर भिकाजी दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

MLC  Election: डॉ. राजेंद्र विखेंसह नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून १५ उमेदवारांची माघार, अशी असेल लढत
Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शिंदेंच्या संपर्कात?

दरम्यान, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुीकत माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी १५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या निवडणुकीत आता २१ उमेदवार रिंगणात राहिलेत. याआधी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यात काल ४ जणांनी तर आज ११ उमेदवारांनी माघार घेतली. दरम्यान ३१ मे ते ७ जून २०२४ या कालावधीत ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते.त्यापैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते.आता त्यात १५ उमेदवारांनी माघार घेतलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com