Loksabha Election: अमरावतीत महायुतीचा कसा लागेल रिझल्ट? बच्चू कडूंनी केलं टेन्शन वाढवणारं भाकीत

Bachchu Kadu : अमरावतीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळणार नसून मोठा फटका महायुतीला बसेल असं भाकीत आमदार बच्चू कडूंनी केलंय. या भाकितामुळे बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय, असं म्हटलं जात आहे.
Loksabha Election: अमरावतीत महायुतीचा कसा लागेल रिझल्ट? बच्चू कडूंनी केलं टेन्शन वाढवणारं भाकीत
Bachchu Kadu

अमर घटारे, साम प्रतिनिधी

अमरावती: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे टप्पे पार झाले असून आता मतदानाचा रिझल्ट काय लागणार याकडे उमेदवारांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान प्रहार संघटनेनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी महायुतीचं टेन्शन वाढवणारं भाकीत केलंय. अमरावतीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळणार नसून मोठा फटका महायुतीला बसेल असं भाकीत आमदार बच्चू कडूंनी केलंय. या भाकितामुळे बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय, असं म्हटलं जात आहे. कडू यांच्या भाकितामुळे नवनणीत राणा यांची धाकधूक वाढलीय.

राज्यातील महत्त्वाच्या लढतीपैकी एक असलेल्या अमरावतीमधील लढतीत भाजपची प्रतिष्ठापणाला लागलीय.अमरावती मतदारसंघात प्रहार संघटना आणि स्वाभिमानी संघटनेमधील संघर्षाने या लढतीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.दरम्यान अमरावती लोकसभा मतदारसंघात स्वाभीमानी संघटनेचं वर्चस्व असतानाही नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश करत कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढली.

राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीची युती झाल्याने या जागेवर भाजपने दावा केला. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश करत त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या.परंतु अमरावतीमधील जागा प्रहार संघटनेला सोडावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. परंतु नवनीत राणा यांना उमेदवारी देत महायुतीने बच्चू कडू यांची नाराजी ओढवून घेतली होती. परंतु आपण महायुतीचा धर्म पाळणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला नव्हता.

सोमवारी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा पार पडला. जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आता त्यांचे डोळे निकालाकडे लागलेत. लोकसभा मतदानाची मतमोजणी ४ जूनला लागणार आहे. त्याच दिवशी देशात कोणाची सत्ता बनेल हे कळणार आहे. पण त्यादरम्यान बच्चू कडूंनी केलेलं भाकीत हे नवनीत राणा यांचं टेन्शन वाढवणारं आहे.

काय म्हणाले बच्चू कडू

लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही. युतीला जे वाटत होते भरघोस यश मिळेल मात्र तशी काही परिस्थिती राहिली नाहीये. लोकांच्या काही प्रमाणात ज्या नाराजी आहे त्या दिसून आल्या आहेत.

ही निवडणूक दोन्ही पक्षांनी जाती आणि धार्मिकतेवर लढवली. या निवडणूक प्रचाराचा कोणताच मुद्दा नव्हता. मुद्द्यापासून ही निवडणूक दूर राहिली आहे. त्यामुळे आता नेमका रिझल्ट कोणत्या बाजूने लागेल सांगता येत नाही असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com