Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शिंदेंच्या संपर्कात?

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच विधान परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागलेत. विधान परिषदेसाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू असतानाच नाशिकमध्ये नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2024:
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: Saamtv

नाशिक, ता. ३१ मे २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचा धुरळा शांत होईपर्यंत आता विधानपरिषद निवडणुकांचे वेध लागलेत. निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर झाली आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधान परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू होण्याआधीच नाशिकमध्ये नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघातून टीडीएफ शिक्षक संघटनेकडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना ठाकरे गटाचा देखील पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2024:
Pune Porsche Accident Case : अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले, ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड

दरम्यान, यंदा विधान परिषद निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांना कोकण पदवीधर मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अभिजित पानसे उद्या किंवा सोमवती उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभेची निवडणूक महायुतीच्या माध्यामातून मनसेने मोदींना पाठींबा दिला होता. परंतु कोकण पदवीधर मतदारसंघात मनसे स्वबळावर निवडणूक लढणार आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2024:
Manmohan Singh News: 'देश वाचवण्याची शेवटची संधी, मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली', डॉ. मनमोहन सिंह यांचा पत्रातून हल्लाबोल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com