सचिन कदम
रायगड : 'मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो, कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, असं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले. त्यामुळे आता भाजपमधील खदखद समोर आली आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. (Bharat Gogawale News)
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर बंडखोरांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं. पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याने भाजपची नाराजी उघड झाली आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक होती. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केल्याचे वक्तव्य केले.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना आमदार भरत गोगावले म्हणाले, आम्ही ५० लोक सत्ता सोडून आलो,ते असेच आलोत का ? आम्ही सत्ता सोडली नसती तर ही युती झाली असती का ? वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटील तुम्हाला दु :ख वाटण्याचे कारण नाही. आम्ही पण तोच त्याग केला आहे, जो चंद्रकांत पाटील बोलत आहे. चालू सत्तेवरून पाय उतार होताना आम्ही किती दगड ठेवले असतील'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.