दगड डोक्यावर ठेवला काय आणि छातीवर ठेवला काय हा त्यांचा....; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
Sharad Pawar News, Political news Updates
Sharad Pawar News, Political news UpdatesSaam TV
Published On

मुंबई: मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, असं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले. या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर दगड डोक्यावर ठेवला काय आणि छातीवर ठेवला काय हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

Sharad Pawar News, Political news Updates
Chandrakant Patil: मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले: चंद्रकांत पाटील

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले: चंद्रकांत पाटील

मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, असं वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले. त्यामुळे आता भाजपमधील खदखद समोर आली आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. पण काही वेळानंतर भाषणाचा व्हिडिओ फेसबुकवरुन डिलीट करण्यात आला आहे.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात शिंदे गट भाजप एकत्र सत्ता स्थापन केली, पण अचानक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. आता मात्र कार्यकारणी बैठकीमध्ये भाजपमधील खदखद समोर आली आहे.

हे देखील पाहा

चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, आपल्याला दुःख झाले. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हकायचा होता. सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले आहेत. आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे, असंही पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com