Maharashtra Politics: शिंदे सेनेच्या आमदारांच्या जिवाला धोका, हत्येचा कट रचणारा सूत्रधार कोण? युवासेनेनं केली मोठी मागणी

MLA Balaji Kinikar: अंबरनाथ विधान मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येच्या कटाची गंभीर दखल घेण्यात यावी. तसेच लवकरात लवकर कटामागील मुख्य सूत्रधाराला शोधून काढावं. अशी मागणी युवासेनेनं केली आहे.
Balaji kinikar
Balaji kinikarSaam tv
Published On

अंबरनाथ विधान मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. बालाजी किणीकर हे एका कार्यक्रमाला लातूरला गेलेले असताना त्यांच्या हत्येचा प्लॅन रचण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं. दरम्यान, यामागचा सुत्रधार कोण? आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत युवासेनेनं अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयात निवेदन देत केलीय.

अंबरनाथ विधान मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येच्या कटाची गंभीर दखल घेण्यात यावी. तसेच लवकरात लवकर कटामागील मुख्य सूत्रधाराला शोधून काढावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी युवासेनेनं केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आम्ही अंबरनाथ बंदची हाक देणार आहोत, असा इशाराही युवासेनेनं दिलाय.

Balaji kinikar
Ambernath Crime: पार्टीच्या वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

अंबरनाथ शहराचा रक्तरंजित इतिहास पुसण्याचं आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मागील काही वर्षात केलं आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट कोण रचतंय? हे समोर आलं पाहिजे, अशी युवा सेनेची मागणी आहे. त्यांनी ही मागणी निवेदनाद्वारे मांडली आहे.

Balaji kinikar
Ambernath News: शिंदेंचा विश्वासू शिलेदार, ४ वेळा आमदार, बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट, शिवसेनेच्याच २ कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

सोबतच अंबरनाथ शहरात जे लोक खासगी सुरक्षारक्षक घेऊन फिरत आहेत. त्यांच्या शस्त्र परवान्यांची तपासणी झाली पाहिजे, हे लोक कुठून आले आहेत? कुठे राहतात? याची पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे, अशीही मागणी युवा सेनेनं केली आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांना समन्स पाठवण्यात आलंय. हे दोघेही किणीकरांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा संशय गुन्हे शाखेनं वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com