मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

Miraj Government Hospital Entrance Gate Slab Collapse Accident: मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेली नवीन कमान कोसळली. स्लॅब कोसळून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती असून बचावकार्य सुरू आहे.
MIRAJ GOVERNMENT HOSPITAL SLAB COLLAPSE
MIRAJ GOVERNMENT HOSPITAL SLAB COLLAPSEsaam tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली: मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेली नवीन कमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कमानीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत सात ते आठ कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

MIRAJ GOVERNMENT HOSPITAL SLAB COLLAPSE
Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

स्लॅब कोसळल्यानंतर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी पाच ते सहा कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून, इतरांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने स्लॅबचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णालय प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

MIRAJ GOVERNMENT HOSPITAL SLAB COLLAPSE
Government Hospital: रुग्णाच्या अंगावरच कोसळला स्लॅब; अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेचा धक्कादायक प्रकार

दरम्यान, शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्याचे काम सुरू होते. कमानीच्या बांधकामासाठी स्लॅब टाकला जात असतानाच तो अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा प्रशासनाकडून अधिकृतपणे स्पष्ट होणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com