अमर घटारे| अमरावती, ता. २९ सप्टेंबर
Uday Samant News: वैमानिकाने टेक ऑफला नकार दिल्याने राज्याचे उद्यागमंत्री उदय सामंत यांना मोटारीने प्रवास करावा लागल्याची बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर हा सगळा प्रकार घडला. याबाबत संबंधित वैमानिकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत शुक्रवारी (ता. २७ सप्टेंबर नागपूर, अमरावती दौरा आटोपून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले होते. तेव्हा वैमानिकाने टेक ऑफ करण्यास नकार दिला. कारण नसताना नकार दिल्याने उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले. याप्रकरणी लोणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत विमानात बसण्यासाठी जात असताना वैमानिक गगन अरोरा यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढले. आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पोहोचणे आवश्यक असून, टेक ऑफ करा, अशी विनंती मंत्री सामंत यांनी वैमानिकाला केली; परंतु काही नियम सांगत वैमानिकाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वैमानिक गगन अरोरा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे. शेवटी मोटारीने उद्योगमंत्री छत्रपती संभाजी नगरला रवाना झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.