नाशिक : जलसंपदा मंत्री जयंत Jayant Pati पाटील यांच्याकडून जलयुक्त शिवारमधील कामांची पाठराखण करण्यात आली आहे जलयुक्त शिवारमधील Jalyukt Shivar काही कामं चांगली देखील झाली आहेत सर्वचं कामं खराब नाहीत असं वक्तव्य त्यांनी आज येवला येथे केलं आहे. तसेच जलयुक्त शिवारमुळे फायदे आणि तोटेही झाले या तज्ञांच्या म्हणण्यावर बोलणार नाही असही ते म्हणाले शिवाय यंदाच्या पावसाची कुणालाही कल्पना नव्हती त्यामुळे हे संकट अचानक पणे ओढावलं असल्याच मतं त्यांनी व्यक्त केलं आहे. (Minister Jayant Patil supported the water-rich Shivar works)
हे देखील पहा -
तसेच झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतामधील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेचं लागतील पंचनामे केल्यानंतरच शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असही ते यावेळी म्हणाले.
शिवाय अनेक धरणांमध्ये गाळ वाढलाय, काही धरणांमधील गाळ काढून ती जागा पुन्हा वापरता येईल यासाठी राज्यसरकारचे प्रयत्न सुरु आहेत. साखर कारखान्यांना Sugar Factories आयकर नोटीस Income Tax Notice आली आहे मात्र शेतकऱ्यांना पैसे वाटून झाले आहेत त्यामुळे आता कारखान्याकडे पैसे नाहीत. टॅक्स भरावा लागला तर कारखानदारी बंद पडेल करदाता जगला पाहिजे, तरच तो कर भरू शकेल आयकर विभागाने ही व्यवहारही दृष्टीकोन ठेवला पाहिजे असही ते म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.