NEET पेपरफुटीनंतर आता आणखी एक पेपर फुटला? शिक्षणक्षेत्रात खळबळ

MHT CET Result Irregularities Investigation Demand In Maharashtra: एमएचटी-सीईटी निकालावर संशयाचे सावट; कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च पर्सेंटाईल मिळाल्याच्या दाव्यांमुळे चौकशीची मागणी. परभणीसह राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण.
MHT CET RESULT CONTROVERSY: STUDENTS DEMAND FAIR INVESTIGATION INTO IRREGULARITIES
MHT CET RESULT CONTROVERSY: STUDENTS DEMAND FAIR INVESTIGATION INTO IRREGULARITIESsaam tv
Published On

विशाल शिंदे, साम टीव्ही

एमएचटी-सीईटी निकालानंतर राज्यभरात निकालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कमी शैक्षणिक गुणवत्तेच्या काही विद्यार्थ्यांनी गुणवत्तायादीत अव्वल स्थान मिळवल्याचा दावा केला जात असून, सीओईपी (COEP) आणि व्हीजेटीआय (VJTI) सारख्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी परीक्षा केंद्र 'मॅनेज' केल्याचे आरोप समोर येत आहेत. यासंदर्भातील दोन व्यक्तींच्या कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. परभणीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनीही या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

MHT CET RESULT CONTROVERSY: STUDENTS DEMAND FAIR INVESTIGATION INTO IRREGULARITIES
Cabinet Reshuffle : राज्यमंत्रिमंडळात फेरबदल होणार, एकनाथ शिंदेंनी बोलवली शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक

एमएचटी-सीईटी निकालानंतर अनेक धक्कादायक दावे समोर येत असल्याने निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही विद्यार्थ्यांना बारावीमध्ये तुलनेने कमी गुण असतानाही सीईटीमध्ये ९९ ते १०० पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परभणीतील कोचिंग क्लासचे शिक्षक संभाजी सवडकर यांनी, काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता लक्षात घेता त्यांना शंभर टक्के गुण मिळणे संशयास्पद असल्याचे सांगितले. बारावीत ४० ते ४५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये ९७ ते १०० पर्सेंटाईल कसे मिळू शकतात, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

MHT CET RESULT CONTROVERSY: STUDENTS DEMAND FAIR INVESTIGATION INTO IRREGULARITIES
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी भाजपच्या बड्या नेत्याला अटक, शिक्षणक्षेत्रासह राजकीय वर्तुळात खळबळ

शिक्षणतज्ज्ञ महेश पाटील यांनीही प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्तायादीचा अभ्यास केल्यानंतर पहिल्या १०० ते २०० विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे सांगितले. दहावी आणि बारावीत कमी गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये अत्यंत उच्च पर्सेंटाईल मिळाल्यामुळे या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा संशय असून, सरकारने स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com