Cabinet Reshuffle : राज्यमंत्रिमंडळात फेरबदल होणार, एकनाथ शिंदेंनी बोलवली शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्र मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
Eknath Shinde Shivsena Meeting
Eknath Shinde Shivsena Meeting
Published On

Eknath Shinde Shivsena Meeting : एकनाथ शिंदे आज शिंदेसेनेतील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. मागील दीड वर्षांतील मंत्र्यांच्या कामगिरीचा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्या निर्णयांच्या झालेल्या अंमलबजावणीचा ते आढावा घेणार आहेत. काही विभागांची कामं होत नसल्याच्या आमदारांच्या तक्रारींनंतर ही बैठक होत असून यात कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी महिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मागील दीड वर्षातील मंत्र्यांची कामगिरी, त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde Shivsena Meeting
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथा आणि विदर्भाला ‘येलो अलर्ट’

अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघांतील कामे संबंधित विभागांकडून व मंत्र्यांकडून होत नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Eknath Shinde Shivsena Meeting
इकडे कच्चे तेल धडाम, तिकडे पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाहीर; जाणून घ्या ग्राहकांना दिलासा मिळाला का?

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची केवळ माहितीच नाही, तर प्रत्यक्ष किती अंमलबजावणी झाली याची तपासणी केली जाईल आणि कमी काम करणाऱ्या मंत्र्यांची कानउघाडणी केली जाणार आहे.

सुमार किंवा कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची (वगळले जाण्याची) दाट शक्यता आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणेच राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल होण्याची चर्चा आहे. यामध्ये काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com