Mhada Lottery: आमदार खासदरांना मुंबईत घरं परवडेना? या नेत्यांनी नाकारले म्हाडाचे स्वस्तातले फ्लॅट

MLA MP Rejected Mhada Homes: म्हाडाची घरं घेण्यास भाजप आमदार आणि खासदारांचा नकार का?
MLA MP Rejected Mhada Homes
MLA MP Rejected Mhada HomesSaam TV
Published On

तुषार ओव्हाळ

Mhada Lottery News:

मुंबईत घर घेण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण मुंबईत घराच्या किंमती या सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. मुंबईत घरं घेणं इतकं महाग आहे की आता आमदार आणि खासदारांनही ही घरं घेणं शक्य होत नाहिये की काय असं चित्र दिसतंय. बरं ही घरं कुठल्या प्रायव्हेट बिरल्डरने बांधलेली नाहीत, तर सरकारच्या म्हाडा या संस्थेने बांधलेली घरं आहेत. आता ही घरं सुद्धा लोकप्रतिनिंधींना परवडेनासे झालीत की काय असा प्रश्न उपस्थित होतो. कुठे आहेत ही घरं, आणि कुठल्या लोकप्रतिनिधींना ही घर परवडत नाहीत? जाणून घेऊयात.

MLA MP Rejected Mhada Homes
BJP MLA Resign: मुख्यमंत्री शिंदेंनंतर फडणवीसांनाही धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराने दिला राजीनामा

म्हाडाचा मुंबईत सर्वात महाग फ्लॅट आहे ताडदेव भागात. दीड हजार स्केअर फूट असलेल्या या फ्लॅटची किंमत ही सात कोटी ५७ लाख रुपये इतकीये. हा फ्लॅट लॉटरीत भाजप आमदार नारायण कुचे यांना लागला होता. पण हा फ्लॅट विकत घेण्यासाठी कुचे पुढे आलेच नाहीत. नंतर वेटिंग लिस्टमध्ये नाव होतं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं. पण त्यांनाही हा फ्लॅट घेणं शक्य झालेलं दिसत नाहिये.

ताडदेवमध्ये म्हाडाने एक बिल्डिंग बांधलीये. त्यापैकी सात फ्लॅट्स हे आजी, माजी आमदार आणि खासदारांसाठी राखीव आहेत. या बिल्डिंगमध्ये भाजप आमदार कुचे यांना हा फ्लॅट लागलाय. कुचे हे जालन्यातल्या बदनापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. पण जेव्हा त्यांना हा फ्लॅट घेता आला नाही, तेव्हा कुचे यांनी म्हाडाकडे हा फ्लॅट सरेंडर केला. कुचे यांच्यानंतर नंबर होता खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांचा. कराड यांनी या फ्लॅटसाठी अर्जही केला होता. पण कराड यांनी कुठलेच डॉक्युमेंट्स सबिमिट केली नाही असं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी म्हटंलय.

माजी आमदार हिरामण वरखेडे यांना लॉटरीत जुहुला आणि गोरेगावला फ्लॅट लागले होते. जुहुतल्या फ्लॅटची किंमत ही अडीच कोटी रुपये तर गोरेगावमधल्या फ्लॅटची किंमत ही ४६ लाख रुपये इतकीये. पण वरखेडे यांनी जुहुचा फ्लॅट सरेंडर केलाय, आणि गोरेगावच्या फ्लॅटसाठी डॉक्युमेंट्स सबिमिट केलेत. गोरेगावच्या फ्लॅटसाठी वेटिंग लिस्टमध्ये होते नंदूरबारचे ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी. त्यांनीही या फ्लॅटसाठी म्हाडाकडे कागदपत्र सुपुर्द केलेत.

  • मुंबईत म्हाडाने ४ हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी काढली होती.

  • २ हजार ७९० घरं ही आर्थिकदृष्ट्या मागास ग्राहकांसाठी होती.

  • त्यापैकी १ हजार ९४७ घरं ही पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत होती.

  • १ हजार ३४ घरं ही निम्न उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी होती.

  • तर १३९ घरं मध्यम उत्पन्न आणि १२० घरं ही उच्च उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी होती.

  • ४ हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी

  • २७९० घरं आर्थिकदृष्ट्या मागास ग्राहकांसाठी

  • १९४७ घरं पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत

  • १३४ घरं निम्न उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी

  • १३९ घरं मध्यम उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी

  • १२० घरं उच्च उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी

म्हाडाच्या घरांची किंमत ही बाजारभावापेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी कमी असते. सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी कमी दरात म्हाडा घरं विकतात. ताडदेव हा तसा उच्चभ्रू लोकांचा एरीया. याच भागात मुकेश अंबानीही राहतात. त्याच भागात आमदार खासदारांना वाजवी दरात फ्लॅट मिळत होते. पण त्यांनीही हे फ्लॅट घेण्यास असमर्थता दर्शवलीये. जर आमदार आणि खासदारांची ही अवस्था असेल तर सामान्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार केलेलाच बरा.

MLA MP Rejected Mhada Homes
Pune Crime: दोन अल्पवयीन मुलांचा धायरी परिसरात गोळीबार; सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com