

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात गोळीबारीची घटना घडलीय. हा गोळीबार दोन अल्पवयीन मुलांनी केला असून यात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झालाय. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. (Latest News)
ंकार तानाजी लोहकरे, असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार आणि त्याचा मित्र सागर ढेबे हे दोघे धायरी येथून दुचाकीवर जात होते. त्यावेळी दोघा अल्पवयीन मुलांनी त्याचा दुचाकीवर पाठलाग केला.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धायरीतील खडक चौकात आल्यानंतर त्यांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून ओंकारवर पाठीमागून गोळीबार केला. त्यात ओंकारचा मृत्यू झाला. ओंकार बाल सुधारगृहात असताना त्याचा अल्पवयीन मुलांशी वाद झाला होता. त्यातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.