Nagpur Zoo Shocking : १८ फुटांची लोखंडी जाळी ओलांडून वाघाच्या पिंजऱ्यात शिरला तरुण, पुढे जे घडलं ते भयंकरच...

Nagpur Zoo News : नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात एक मनोरुग्ण थेट वाघाच्या पिंजऱ्यात शिरल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Nagpur Zoo News
Nagpur Zoo
Published On
Summary
  • मनोरुग्ण व्यक्तीने १८ फूट उंच लोखंडी जाळी ओलांडून वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला.

  • त्यावेळी दोन वाघ पिंजऱ्यात होते, मात्र बंद भागात असल्याने कोणतीही दुर्घटना झाली नाही.

  • सुरक्षारक्षकांनी वेळीच लक्ष घालून त्या व्यक्तीला वाचवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • या घटनेनंतर प्राणीसंग्रहालयातील सुरक्षेच्या उपाययोजनांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका मनोरुग्णाने थेट वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पिंजऱ्याभोवती असलेल्या तब्बल १८ फूट उंच लोखंडी जाळी ओलांडून हा मनोरुग्ण आत शिरला त्यावेळेस या पिंजऱ्यात दोन वाघ होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात सुरक्षारक्षक येण्याजाण्यासाठी जो गेट वापरतात, त्याच मार्गाने एक मनोरुग्ण आत शिरला. या पिंजऱ्याच्या आत आणखी एक गेट होता. जो वाघाला मोकळे सोडण्यासाठी वापरला जातो. वाघांच्या पिंजऱ्याभोवती १८ फूट उंच लोखंडी असलेली जाळी ओलांडून हा मनोरुग्ण वाघांच्या पिंजऱ्यात शिरला. त्यावेळी पिंजऱ्यात दोन वाघ होते. परंतु त्या क्षणी वाघ पिंजऱ्याच्या एका बाजूला बंद असलेल्या भागात असल्याने मोठी दुर्घटना टळली.

Nagpur Zoo News
World Zoo Park: ऐकावे ते नवलच! पर्यटक पिंजऱ्यात अन् प्राणी फिरतात मोकाट

सुरक्षारक्षकांनी ही बाब वेळीच लक्षात घेतली आणि त्वरीत कारवाई करत या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढले. ही घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात या व्यक्तीवर मानसिक आजार असल्याचे आढळून आले आहे.

Nagpur Zoo News
Rajiv Gandhi Zoo : पाच दिवसात १४ हरणांचा मृत्यू; पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना

वाघांच्या पिंजऱ्याभोवती १८ फूट उंच लोखंडी जाळी असूनही तो आत कसा गेला, याची चौकशी सध्या सुरू आहे. प्राणीसंग्रहालय प्रशासन आणि पोलिसांकडून याप्रकरणी सखोल तपास केला जात असून सुरक्षेच्या उपाययोजनांवरही नव्याने विचार केला जात आहे. ही घटना सिस्टीममधील सुरक्षेच्या त्रुटी दर्शवते की नाही, याबाबतही विचारमंथन सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा बसवण्याचा विचार सुरू आहे.

Q

ही घटना कुठे घडली?

A

नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात ही घटना सकाळी घडली.

Q

व्यक्ती वाघाच्या पिंजऱ्यात कशी गेली?

A

ती व्यक्ती १८ फूट उंच लोखंडी जाळी ओलांडून आत गेली.

Q

त्यावेळी पिंजऱ्यात वाघ होते का?

A

होय, त्या वेळी दोन वाघ पिंजऱ्यात होते, मात्र ते बंद भागात असल्याने जीवितहानी टळली.

Q

पोलिसांनी काय कारवाई केली?

A

पोलिसांनी त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढून ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com