Rajiv Gandhi Zoo : पाच दिवसात १४ हरणांचा मृत्यू; पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना

Pune News : प्राणी संग्रहालयात ९८ पेक्षा अधिक हरिण आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या हरणांसाठी उद्यानात स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे गेल्या चार ते पाच दिवसांच्या कालावधीत १४ हरणांचा मृत्यू
Rajiv Gandhi Zoo
Rajiv Gandhi ZooSaam tv
Published On

अक्षय बडवे 

पुणे : प्राणी संग्रहालयात वेगवेगळे प्राणी आहे. यात हरणांसाठी स्वतंत्र व्यवस्था असताना मागील चार- पाच दिवसात १४ हरणांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात घडली आहे. या हरणांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला; याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. सर्व मृत हरणांचे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.  

पुणे शहरातील कात्रज भागात असलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अत्यंत प्रसिद्ध असं उद्यान आहे. या ठिकाणी विविध पशु तसेच प्राणी असून हे पाहण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो किंवा इतर दिवशी सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रामुख्याने संग्रहालयात माकड, मगर, वाघ, सिंह यासारखे अनेक प्राणी आहेत.

Rajiv Gandhi Zoo
Wardha : ५० हून अधिक पोपटांचा अचानक मृत्यू; शेतातील फवारणी केलेले खाद्य खाण्यातून विषबाधा

१४ हरणांचा अचानक मृत्यू 
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १४ हरणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेची बाब पसरली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये या ठिकाणच्या १४ हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्राणी संग्रहालयात ९८ पेक्षा अधिक हरिण आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या हरणांसाठी उद्यानात स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. तरी देखील गेल्या चार ते पाच दिवसांच्या कालावधीत १४ हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इतक्या हरणांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

Rajiv Gandhi Zoo
Crime News : मंदिरात येत प्रथम दर्शन; महादेवाच्या मंदिरातील चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, पिंपरी चिंचवडमध्ये दोन मंदिरात चोरी

नमुने तपासणीसाठी रवाना 
हरणांच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून हरणांच्या मृत्यू बाबत अहवाल येईपर्यंत त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकणार नाही; अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच रोग अन्वेषण विभाग आणि महाराष्ट्र झू ऑथॉरिटी त्यांच्या अधिकाऱ्यांनी हरणांचा अधिवास असलेल्या ठिकाणाहून आणि करत काही नमुने सुद्धा प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

खाद्य पदार्थांचेही घेतले नमुने 
पुणे महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी घनश्याम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये १४ हरणांचा मृत्यू झाला. आज मॉर्टालिटी रेट हा शून्य असून आज कुठलेही हरिण दगावले नाही. ज्या दिवसापासून ही घटना घडली आहे; त्याच दिवसापासून आम्ही याबाबत तपास करत आहोत. विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी हरणांच्या खाद्य पदार्थांमधून काही इन्फेक्शन झाले आहे का? यासाठी अन्नाचे नमुने सुद्धा तपासले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com