Wardha : ५० हून अधिक पोपटांचा अचानक मृत्यू; शेतातील फवारणी केलेले खाद्य खाण्यातून विषबाधा

Wardha News : शेतात किटकनाशकांच्या फवारणीचे काम सुरू असताना काही खाऊन आल्यावर जवळील झाडांवर वास्तव्य करणाऱ्या पोपटांना विषबाधा झाली. काही पोपट त्वरित मृत्युमुखी पडले, तर काही अजूनही गंभीर अवस्थेत आढळले
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: सध्या काही शेतकऱ्यांकडून पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. तर काहींच्या शेतात पिके मोठी झाल्याने त्यावर रासायनिक फवारणी सुरु आहे. पेरणी करताना शेतकऱ्यांकडून बियाण्यांना किड्यांपासून वाचविण्याकरिता त्यांच्यावर रासायनिक फवारणी करण्यात येते. अशीच रासायनिक क्रीया केलेली बियाणे किंवा फवारणी केलेले खाद्य खाण्यात आल्याने आर्वीत ५० वर पोपटांचा मृत्यू झाला. तर आठ पोपट गंभीर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे बस स्टॅन्ड रोड आर्वी येथील बँक ऑफ इंडिया लगतच्या लिंबाच्या झाडाखाली सदरची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वन परीक्षेत्र अधिकारी आर्वी गायत्री सोनावणे यांनी घटनास्थळ गाठत तपासणी केली. दरम्यान शेतात किटकनाशकांच्या फवारणीचे काम सुरू असताना काही खाऊन आल्यावर जवळील झाडांवर वास्तव्य करणाऱ्या पोपटांना विषबाधा झाली. काही पोपट त्वरित मृत्युमुखी पडले, तर काही अजूनही गंभीर अवस्थेत आढळले. 

Wardha News
Kalyan Crime : कल्याण हादरलं! अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, रेल्वे पोलिसांनी विकृताच्या मुसक्या आवळल्या

दरम्यान सदर प्रकार लक्षात आल्यानंतर गंभीर अवस्थेत सापडलेल्या पोपटांवर तत्काळ प्रथमोपचार करण्यात आले. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वन परीक्षेत्र अधिकारी आर्वी गायत्री सोनावणे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. पोपट मृत्यूमुखी पडल्याची माहिती प्राणीमित्र गौरव ठाकूर, मनीष ठाकरे, संतोष पडोळे, आनंद काळे, कार्तिक कतोडे, दर्शन वानखडे, युवराज ठाकूर, साहिल कश्यप, नितेश बेलेकर, नयन थिगले आणि ललित वांगे यांनी तत्परतेने पुढाकार घेतला.

Wardha News
Ambarnath News : कामावर जाताना रस्त्यात दुचाकी थांबविली; पेट्रोल काढून अंगावर ओतून स्वतःला घेतले पेटवून

जैविक फवारणीचे आवाहन 
ही घटना निसर्गाच्या समतोलासाठी गंभीर इशारा देणारी आहे. विविध प्राणीमित्र संघटनांनी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकाराची दखल घेऊन कृषी फवारणीत जैविक व पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com